फ्लिपकार्टचा महासेल सुरु, ‘या’ वस्तूंवर भरघोस सूट
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. फ्लिपकार्टचे बिग शॉपिंग डेज सुरु झाले आहेत. हा महासेल 6 ते 8 डिसेंबर दरम्यान चालणार आहे. या महासेलमध्ये एकापेक्षा एक ऑफर देण्यात आले आहेत. एचडीएफसी बँकेचं क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांना आणखी 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. या महासेलमध्ये लॅपटॉप ते अॅप्पल वॉचवर मोठ्याप्रमाणात सूट देण्यात […]
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. फ्लिपकार्टचे बिग शॉपिंग डेज सुरु झाले आहेत. हा महासेल 6 ते 8 डिसेंबर दरम्यान चालणार आहे. या महासेलमध्ये एकापेक्षा एक ऑफर देण्यात आले आहेत. एचडीएफसी बँकेचं क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांना आणखी 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. या महासेलमध्ये लॅपटॉप ते अॅप्पल वॉचवर मोठ्याप्रमाणात सूट देण्यात आली आहे.
कोणकोणत्या वस्तूंवर ऑफर्स :
Asus ZenFone Max Pro M1 : हा फोन लॉन्च झाल्यापासूनच फ्लिपकार्ट आपल्या प्रत्येक सेलमध्ये यावर मोठी सूट देत आहे. सध्या फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. तर याची मूळ किंमत 10,999 रुपये आहे. याचाच 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा फोन 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, याची मूळ किंमत 14,999 रुपये इतकी आहे. यामध्ये 5.99 इंच आकाराचा फूल एचडी डिस्प्ले आणि ड्यूअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर याची बॅटरी 5000 mAh इतकी आहे.
Poco F1 : या फोनवर देखील फ्लिपकार्टने मोठी सूट दिली आहे. याचा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजचं व्हर्जन 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची मूळ किंमत 21,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा फोन 25,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची मूळ किंमत 30,999 रुपये आहे.
Google Pixel-3 64GB : फ्लिपकार्ट गुगल पिक्सल-3 64GB फोनवर 4,500 रुपयांची सूट देतो आहे. जर तुम्ही तुमचा जूना स्मार्टफोन एक्सचेंज करत असाल, तर तुम्हाला 14,900 पर्यंतची सूट मिळू शकते. एचडीएफसी बँकेचं क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड असणाऱ्यांना 10 टक्क्यांची एक्स्ट्रा सूट मिळणार आहे. या फोनमध्ये 5.5 इंच आकाराचा फूल एचडी डिस्प्ले तसेच Qualcomm’s snapdragon 845 SoC आहे. या फोनची मूळ किंमत ही 71,000 रुपये आहे. पण या ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला केवळ 66,500 रुपयांत मिळणार आहे.