Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishali: बिहारच्या पुराने ऐतिहासिक अशोक स्तंभावरही संकट, पाण्यामुळे स्तंभ झुकला

बिहारमधील वैशाली येथील ऐतिहासिक अशोक स्तंभ आणि बौद्ध स्तूप परिसरालाही पुराचा फटका बसला आहे.

Vaishali: बिहारच्या पुराने ऐतिहासिक अशोक स्तंभावरही संकट, पाण्यामुळे स्तंभ झुकला
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 10:47 PM

पाटणा : बिहारमधील वैशाली येथील ऐतिहासिक अशोक स्तंभ आणि बौद्ध स्तूप परिसरालाही पुराचा फटका बसला आहे. या संपूर्ण परिसरात देखील पुराचं पाणी साठलेलं आहे. यामुळे अशोत स्तंभ काहीसा झुकलेला दिसत आहे. कोल्हुआमध्ये तयार करण्यात आलेल्या या ठिकाणी गुप्त, शुंग आणि कुशान साम्राज्याची चिन्ह सापडतात. पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार, पुराचं पाणी या स्तूपात अगदी आतमध्ये भरलं गेल्याने अनेक स्तभांवर याचा परिणाम झाला आहे. पाण्यामुळे या खांबांचं नुकसान होत आहे (Flood water spread in the historic Ashoka Stumbh Pillar in Vaishali Bihar).

अवती भवतीच्या परिसराच्या तुलनेत अशोक स्तंभ आणि कोल्हुआ बौद्ध स्तूपाचा परिसर खोलगट आहे. त्यामुळे आजूबाजूचं सर्व पावसाचं पाणी या ठिकाणी साठलं आहे. पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणचे तलाव आणि छोटे छोटे स्तूप देखील पाण्यात बुडाले आहेत.

या भागातील पाणी कमी करण्यासाठी येथील पाणी उपसून जवळच्या दुसऱ्या तलावात सोडले जात आहे. मात्र पाण्याचं प्रमाण इतकं अधिक आहे की पाणी उपसाही करणं शक्य होत नाहीये. अशोक स्तंभाचा परिसर आर्किलोजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकार क्षेत्रात आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यंटक भेट देत असतात.

सम्राट अशोककडून अशोक स्तंभ आणि बौद्ध स्तूपांची निर्मिती

सम्राट अशोक कलिंग विजयानंतर बौद्ध धर्माचे अनुयायी बनले होते. बुद्धांनी आपला शेवटचा उपदेश वैशालीतील याच ठिकाणी दिला होता. त्यामुळेच अशोकाने वैशालीत एक अशोक स्तंभ तयार केला. बुद्धांच्या स्मरणार्थ हा स्तंभ तयार करण्यात आला. हा स्तंभ इतर स्तंभांच्या तुलनेत खूप वेगळा आहे. या स्तंभाच्या अग्रभागावर एका सिंहाची आकृती कोरली आहे. या सिंहाचं तोंड उत्तर दिशेला आहे. उत्तर ही बुद्धांच्या अंतिम यात्रेची दिशा मानली जाते.

स्तंभाच्या शेजारीच विटांचा एक स्तूप आणि एक तलाव आहे. या तलावाला रामकुंड असं नाव आहे. हे ठिकाण बौद्धधर्मियांसाठी खूप पवित्र स्थान आहे. कोरोना साथीरोगाच्या आधी या ठिकाणी जपान, चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, कॅनडा आणि नेपाळसह अनेक देशांमधून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात.

हेही वाचा :

मुसळधार पावसामुळे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये अडकले, जेसीबीच्या मदतीने बाहरे काढले

व्हिडीओ पाहा :

Flood water spread in the historic Ashoka Stumbh Pillar in Vaishali Bihar