मुंबई : मधुमेह (Diabetes) हा एक आजार आहे जो सर्व वयाच्या लोकांसाठी त्रासदायक ठरतो. मधुमेह या आजारावर अद्याप कोणताही इलाज उपलब्ध झालेला नाही. मधुमेह हा असा आजार आहे की, तो झाल्यानंतर लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. तसेच या दरम्यान आरोग्या विषयीदेखील छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. केवळ आहार आणि योग्य जीवनशैली द्वारे या समस्येला नियंत्रित केले जाऊ शकते (Food For Control diabetes and sugar level in human body).
आरोग्य तज्ज्ञांच्या मते शरीरातील साखर वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. जंक फूड खाणे, जास्त गोड पदार्थ खाणे, प्रथिनांची कमी आणि ग्लाइसेमिकयुक्त वस्तू खाल्यास साखर वाढू शकते. मधुमेहाविरुद्ध लढा देण्यासाठी, आपण आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी आपण जंक फूडऐवजी पौष्टिक अन्नाचे सेवन करण्यावर भर दिला पाहिजे. याकरिता आहारात काही घटकांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
पालक, मेथी इत्यादी भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. कोणत्याही रोगात, डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये त्यामध्ये कॅलरी आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यातील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे आपल्या हृदय आणि डोळ्यांनादेखील फायदा होतो.
हळद आपल्या सर्वांच्याच स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. मसाल्यातील हा घटक आपल्याला शरीरासाठी देखील लाभदायी ठरतो. हळदीत आढळणारे कर्क्युमिन हृदयरोगांपासून आपले संरक्षण करते आणि साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत करते (Food For Control diabetes and sugar level in human body).
लसूण ही एक गोष्ट आहे जी आपल्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर करते. जर एखाद्याला रक्तातील साखर किंवा कोलेस्टेरॉल कमी करायचा असेल तर, त्यांच्यासाठी हळदीचे सेवन खूप फायदेशीर ठरते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात लसूणचा समावेश करणे आवश्यक आहे.
टोमॅटोचा रस मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोच्या रसामध्ये मीठ आणि मिरपूड टाकून हा काढा पिऊ शकता. हा काढा आपल्या मधुमेहाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन-ई असते, जे टाइप -2 मधुमेहापासून तुमच्या शरीराचे रक्षण करते. अक्रोड हृदयरोगासाठी देखील खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. अक्रोड केवळ आपली साखर नियंत्रित ठेवत नाही तर, कोलेस्टेरॉलची पातळीही कमी करते.
टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
(Food For Control diabetes and sugar level in human body)
Food | वजनासहित रक्तदाब कमी करण्यासाठी गुणकारी ‘बीट’, जाणून घ्या 10 फायदे!https://t.co/j6kpG2NMZl#food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2020