स्वीडन ते दिग्रसवाणी, डॉ. चित्रा कुऱ्हेंची ग्रामपंचायतची विजयी कहाणी
हिंगोलीच्या दिग्रसवाणी ग्रामपंचायतीत वंचितच्या बहुजन आघाडी पुरस्कृत ग्राम विकास पॅनलने डॉ. चित्रा कुऱ्हेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती. (Digraswani Gram Panchayat Election Hingoli)
हिंगोली : परदेशवारी केल्यानंतरही मातीशी घट्ट नाळ असलेल्या पीएचडीधारक महिला उमेदवाराची यशोगाथा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. हिंगोलीतील ग्रामपंचायतीच्या राजकारणात चक्क फॉरेन रिटर्न पीएचडीधारक महिलेने भाग घेतला होता. वंचित बहुजत आघाडी पुरस्कृत पॅनेलने डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. (Foreign return PhD holder Dr Chitra Kurhe won Digraswani Gram Panchayat Election Result in Hingoli)
आठ जागांवर वंचितच्या उमेदवारांची बाजी
हिंगोलीच्या दिग्रसवाणी ग्रामपंचायतीत वंचितच्या बहुजन आघाडी पुरस्कृत ग्राम विकास पॅनलने 9 जागांवर निवडणूक लढवली होती. नऊपैकी आठ जागांवर वंचितच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना धक्का दिला. वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी समूहाच्या फॉरेन रिटर्न डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली.
हरहुन्नरी डॉ. चित्रा कुऱ्हे रिंगणात
डॉ. चित्रा यांनी राज्यशास्त्र या विषयातून स्वीडनमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांना पाच भाषाही अवगत आहेत. परदेशी उच्चशिक्षण घेतल्यानंतरही त्या स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य आठ वर्ष परदेशी स्थायिक झालं होतं. त्यांनी स्वीडनसह जपानसारख्या काही देशांमध्ये वास्तव केलं आहे.
मातीशी नाळ कायम घट्ट
परदेशी असूनही कुऱ्हे दाम्पत्याने आपल्या मातीशी नाळ कायम घट्ट ठेवली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी दिग्रसवाणी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसमावेशक उमेदवार उभे केले होते. एकूण नऊपैकी आठ जागांवर वंचितचे उमेदवार निवडून आणून कुऱ्हे दाम्पत्याने चमत्कार घडवून आणला. (Foreign return PhD holder Dr Chitra Kurhe won Digraswani Gram Panchayat Election Result in Hingoli)
डॉ. चित्रा कुऱ्हे सरपंचपदाचा चेहरा
विशेष बाब म्हणजे चूल आणि मूल इथपर्यंतच असलेल्या सहा महिला या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांना सरपंचपदाचा उमेदवार जाहीर करुनच प्रचार करण्यात आला होता. आता विजय मिळवल्यानंतर दिग्रसवाणीला आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा मानस डॉ. चित्रा कुऱ्हे यांनी व्यक्त केला.
गिरगाव ग्रामपंचायत निकाल, पत्नीच्या विजयानंतर पतीदेवांचा जल्लोष
संबंधित बातम्या :
पुण्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, पूनम कडवळेची 21 वर्षी ग्रामपंचायतीत एन्ट्री
यशस्वी स्त्रीच्या मागे, खंबीर पुरुषाचाही हात असतो, महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी!
(Foreign return PhD holder Dr Chitra Kurhe won Digraswani Gram Panchayat Election Result in Hingoli)