शिरुरमध्ये काश्मीर! ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड
शिरुर तालुक्यातील मुखई येथील अभिजीत प्रल्हाद धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड करुन दाखवली
पिंपरी चिंचवड : सफरचंद म्हटलं की पटकन कोणाच्याही डोळ्यासमोर उभं राहतं ते काश्मीर. मात्र हे विसरायला लावणारी सफरचंदाची लागवड पुणे जिल्ह्यात होत आहे. शिरुर तालुक्यातील मुखई येथील अभिजीत प्रल्हाद धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड करुन दाखवली. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या हर्मन-99 या जातीच्या सफरचंदाला सध्या तिसऱ्याच वर्षी चांगली फळे लागली आहेत. (Forget Kashmir See the Apple Farming in Shirur Pune)
सीताफळाइतकेच कोडगे पिक पुण्यातील प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवडसफरचंदाचे असून पुणे जिल्ह्यातील वातावरण सफरचंदासाठी काश्मीरलाही विसरायला लावणारे ठरले आहे. पर्यायाने सफरचंदासाठी काश्मीरचाही विसर पाडायला लावण्याचे काम आता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील शेतकरी करु शकतात.
शिक्रापूर जवळील मुखई गावचे अभिजीत प्रल्हाद धुमाळ आणि अतुल प्रल्हाद धुमाळ हे दोन बंधू प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. अभिजीत हे स्वत: वेगवेगळे कृषी प्रयोग करत असतात. ऊसाच्या सर्व वाणांची बियाणे बनवण्याबाबत त्यांची कीर्ती राज्यभर आहे.
दोन वर्षांपूर्वी अभिजीत यांनी सफरचंद लागवडीचा विचार केला आणि कामही सुरु केले. हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी भागातील शेतकऱ्यांचे फोन नंबर मिळवून त्यांनी संपर्क सुरु केला आणि इंटरनेटवरुनही बरीचशी माहिती संकलित केली.
तब्बल सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर त्यांनी हर्मन-99 हा सफरचंदाचा वाण निवडला. अगदी सीताफळासारख्याच पद्धतीने त्याची लागवड केली. 12 फूट लांब आणि 12 फूट रुंद अंतरात पाऊण एकरात साधारण 200 झाडांची लागवड केली. कुठलीच वेगळी खते नाहीत, की वेगळी मशागत नाही. उलट जादा पाण्याने झाडे दगावण्याचे प्रमाण राहिल्याने सर्व काही अगदी सीताफळासारखे त्यांना अनुभवयाला आले. धुमाळ भावंडांच्या अनुभवाचा फायदा घेत, अन्य शेतकरीही सफरचंदाची लागवड करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
काश्मीरमधील सफरचंदाची नाशिकमध्ये लागवड, डाळींबासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सफरचंदाची बागhttps://t.co/rwmzurlUos #Nashik
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2020
संबंधित बातम्या :
थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची नेवाशात लागवड, सोमेश्वररावांना लॉकडाऊनमध्ये चार लाखांचा नफा
(Forget Kashmir See the Apple Farming in Shirur Pune)