साधा शिवसैनिक ते मंत्री अन् अभिनेताही… कसा आहे बबनराव घोलप यांचा राजकीय प्रवास?

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि अनेक वेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला आहे. स्थानिक राजकारणाच्या नाराजीतून हे सर्व घडल्याची माहिती समोर आली आहे.

साधा शिवसैनिक ते मंत्री अन् अभिनेताही... कसा आहे बबनराव घोलप यांचा राजकीय प्रवास?
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 11:19 AM

नाशिक | 15 फेब्रुवारी 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि अनेक वेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला आहे. स्थानिक राजकारणाच्या नाराजीतून हे सर्व घडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापलाथ सुरू आहे. या आठवड्याच्य सुरूवातीलाच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये गेले. तर आता बबनराव घोलप यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत बबनराव घोलप ?

पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात ते 5 वेळा आमदार राहिले आहेत. पहिल्या विधानसभेतच डायरेक्ट मंत्री म्हणून गळ्यात माळ पडली. मंत्री म्हणून महाराष्ट्रभर दौरा करून आपला समाज एकत्र करणारा करण्याची हातोटी त्यांच्यात आहे.

महिला व बालकल्याण, ही महत्वाची खाती तसेच समाजकल्याण व माजी सैनिकांचे कल्याण अशा खात्यांचा मंत्री म्हणून घोलप यांनी काम पाहिलं. महिलांसाठी ३३% आरक्षण देऊन स्वतंत्र बजेट मांडले. चीन या देशाच्या बीजिंग येथे अर्थसंकल्प मांडणारे जगातील पहिले मंत्री ठरले. खत्री आयोगाची स्थापना, भटक्या जमातीची अ, ब, क, ड अशी विभागणी करून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिले. शासनाच्या माध्यमातून समाजाला ३५० आश्रम शाळा, ३०० वसतिगृहे, ६ सूतगिरण्या व ४०० वृद्धाश्रम हे नानांनी दिले.

लहानपणापासून गरिबीचे चटके खाल्ल्याने, सामाजिक झळ पचविल्याने व जगण्यासाठी संघर्ष करत घोलप मोठे झाले. त्यांच्या समाजसेवेमुळेच प्रभावित होऊन मा. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःहून पत्र पाठवून त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ केली. लोकांची सेवा करण्याची एक मोठी संधी त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून त्यांना मिळाली आणि बबनराव घोलप यांनीही या संधीचं सोनं केलं. शिवसेना पक्ष सत्तेत आल्यानंतर मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी घोलप यांना समाजकल्याण मंत्री बनवून आपल्या समाजाची सेवा करण्याची जी संधी दिली. त्या संधीचा उपयोग करत त्यांनी सर्वप्रथम विखुरलेला आपला समाज एकत्र केला.

बबनराव घोलप या धडाकेबाज समाजकल्याण मंत्री असलेल्या चर्मकार नेत्याने एका झटक्यात समाज गोळा केला. छोट्या – मोठ्या २०० संघटना विसर्जित करून महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना केली आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. पुढे याच संघटनेचा विस्तार करीत देशपातळीवर नेऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघाची गुढी रोवली. आज या संघटनेचे देशपातळीवर हजारो पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक खेडोपाडी पोहोचलेली संघटना म्हणून आजही लौकिक आहे.

कला क्षेत्रातही योगदान

राजकारणा सोबतच त्यांनी कला क्षेत्रातही योगदान दिलं. घोलप यांनी कितीतरी चित्रपट व नाटकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. निलांबरी, शेगावीचा राणा गजानन, मेरी मर्जी, सत्य साईबाबा या चित्रपटाची निर्मिती नानांनी केली असून, राजा शिव छत्रपती या सह्याद्री वाहिनी वरील प्रदर्शित झालेल्या मालिकेचे देखील निर्माते होते. सेच निलांबरी, अष्टभुजा सप्तशृंगी माता, शेगावीचा राणा गजानन, अत्तराचा फाया, जय वैभव लक्ष्मी माता, वंशवेल, घरंदाज, श्री सत्य साईबाबा, नागराज तुझा भाऊ राया, बाप माणूस, संसार माझा सोन्याचा, विडा एक संघर्ष, शाहू महाराज मालिका अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या.

शिवसेनेत नाराजी का ?

माजी मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते असलेले बबन घोलप गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. ठाकरे गटातून बाहेर पडल्यास बबनराव घोलप यांना पक्षात घ्यायाला भाजपा सुद्धा तयार होता. पण त्यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरलीय. दोन वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झालं, त्यावेळी सुद्धा घोलप पितापुत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. पण भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशाने सगळ गणित बदललं. भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. त्यावरुन बबनराव घोलप नाराज होते. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता ही जागा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळू शकते, त्यामुळे बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.