“घरात मतिमंद मुलगा सैरभैर, फार हताश वाटतं” निधनापूर्वीची नीला सत्यनारायण यांची ‘घुसमट’

| Updated on: Jul 16, 2020 | 3:02 PM

नीला सत्यनारायण 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण परिचित होत्या.

घरात मतिमंद मुलगा सैरभैर, फार हताश वाटतं निधनापूर्वीची नीला सत्यनारायण यांची घुसमट
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं निधन झालं. ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. “घरात मतिमंद मुलगा सैरभैर झाला आहे, फार हताश वाटतं” अशा भावना व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केली होती. नीला सत्यनारायण यांची ही ‘घुसमट’ वाचून वाचकही हळहळत आहेत. (Former State Election Commissioner of Maharashtra Neela Satyanarayanan Social Media Post before Death)

काय आहे पोस्ट?

घुसमट…

“जवळ जवळ तीन महिने झाले या लॉकडाऊनला. आधी भाजीपाला मिळायचा, वाणसामानही मिळायचं आता तेही मिळेनासं झालं. कोणाकोणाला विनंती करुन सामान मागवलं. दूर जायचं म्हटलं तर गाडी हवी. बस तर बंदच आहे. रस्त्यात पोलिसांची भीती. ते आपला अपमान करतील, गाडी जप्त करतील याची धास्ती.”

“घरात एक मतिमंद मुलगा. तो सैरभैर झालेला. त्याला कळत नाही की आजूबाजूला काय चाललं आहे, का चाललं आहे. त्याला रोज फिरुन यायची सवय आहे. ती त्याची गरज आहे. त्याला मी समजावू शकत नाही. मला फार हताश वाटतं. आपण एकमेकांशी बोलतो, मित्रांना फोन करतो, त्याने काय करावं? त्याची घुसमट कोणाला समजणार आहे?” अशा भावना नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केल्या होत्या.

कोण होत्या नीला सत्यनारायण?

नीला सत्यनारायण 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण परिचित होत्या.

नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

सनदी अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होतीच, मात्र साहित्य क्षेत्रातही त्यांची मुशाफिरी होती. संवेदनशील कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या.

नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.

‘कोरोना’ने आणखी एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अशा राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संबंधित बातमी

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं निधन

(Former State Election Commissioner of Maharashtra Neela Satyanarayanan Social Media Post before Death)