निगेटिव्ह रिपोर्ट मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह, माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मृत्यूने गोंदियात खळबळ

गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Former Zilla Parishad President Died By Corona)

निगेटिव्ह रिपोर्ट मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह, माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Follow us
| Updated on: Sep 13, 2020 | 10:50 PM

गोंदिया : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असताना या जीवघेण्या संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. अशातच गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांचा आज कोरोनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गोंदिया जिल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे (Former Zilla Parishad President Died By Corona).

काल संध्याकाळी सीमा मडावी यांना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास आणि न्युमोनिया झाला असल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य उपचार सुरु होते. मागील आठवड्यात त्यांनी कोरोना तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

मात्र, काल पुन्हा चाचणी केली असता, आज त्यांचा मृत्यू झाल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांचे पती देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सीमा मडावी यांनी 2015 मध्ये पहिल्यांदाच राजकारणारात प्रवेश करत गोंदिया तालुक्यातील फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढवीत विजय मिळवला. जिल्हा परिषद सदस्याचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपताच जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांची जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून निवड झाली. 31 जुलैला जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्या पदमुक्त झाल्या होत्या. सीमा मडावी या फक्त 42 वर्षांच्या होत्या (Former Zilla Parishad President Died By Corona).

संबंधित बातम्या : 

नागपूरकरांनो सावधान! मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचे गृहमंत्र्यांचे आदेश

व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा पर्यटन पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.