अमरावती : अमरावती येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले चार कोरोनाबाधित रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना आज (24 एप्रिल) डिस्चार्ज देण्यात (Amaravati corona patient recover) आला. रुग्णालयात दाखल असलेल्या या चारही रुग्णांचे रिपोर्ट उपचारानंतर निगेटिव्ह आले. त्यामुळे या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही बाब दिलासा देणारी ठरली असून, रुग्णालयाचे डॉक्टर, पारिचारिका आणि आरोग्य कर्मचऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या चौघांचे अभिनंदन (Amaravati corona patient recover) केले.
हाथीपुरा परिसरातील एका निधन झालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या चौघांना अमरावतीमधील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला आणि दोन पुरूषांचा यामध्ये समावेश आहे.
या चारही रुग्णांना अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीतील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. येथे तज्ज्ञ डॉक्टर, पारिचारिका आणि यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. येथे 14 दिवस या रूग्णांवर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सर्व डॉक्टर, पारिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन बऱ्या झालेल्या रूग्णांना शुभेच्छा दिल्या.
“डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. अमरावती महापालिका हद्दीतील पहिल्या रूग्णाच्या संपर्कातील चारजण आज बरे होऊन परतत आहेत, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी आणि मनोबल वाढवणारी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. निकम यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 6427 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 840 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 वर, पहिल्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात अॅडमिट