Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुड न्यूज! पुण्यात चार महिन्याच्या चिमुरड्याची कोरोनावर मात

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात (Four Month old Baby Corona recovered) आला आहे.

गुड न्यूज! पुण्यात चार महिन्याच्या चिमुरड्याची कोरोनावर मात
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 8:33 AM

पुणे : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात (Four Month old Baby Corona recovered) आला आहे. या दरम्यान पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका चार महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त चिमुरड्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज देऊन त्याला घरी (Four Month old Baby Corona recovered) सोडलं आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालयात या चिमुरड्यावर उपचार सुरु होते. चौदा दिवसांच्या उपचारानंतर बाळ ठणठणीत बरे झाल्यामुळे डॉक्टरांनीही बाळाला डिस्चार्ज दिला. येरवडा परिसरातील एका कुटुंबातील आजोबांना कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांच्या घरातील चार महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती.

आजोबांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी तपासणी केली असता चार महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आढळून आलं होते. तर बाळाच्या आई-वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 13 एप्रिलपासून बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचारादरम्यान बाळाची आईही बरोबर होती. चौदा दिवसांनतर बाळाची दुसरी तपासणी केल्यानंतर बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला घरी सोडले.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवसे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहे. राज्यात आतापर्यंत 9318 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 400 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1388 कोरोनामुक्त झालेले आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात 143 नवे कोरोनाबाधित, एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या

आजाराचा बनाव, पुणे मनपा कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करणार, अतिरिक्त आयु्क्तांचा इशारा

पुण्यात रक्ताचा तुटवडा, विभागीय आयुक्त म्हैसेकरांचं नागरिकांना आवाहन

पुण्यात कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, मृत महिलेच्या पती, मुलासह चौघांना कोरोनाची बाधा

तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.