उसने दिलेले पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक

उसने दिलेले पैसे परत न केल्याने व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Four People Arrested from pune on Kidnapping Case) 

उसने दिलेले पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 6:17 PM

मुंबई : उसने दिलेले पैसे परत न केल्याने एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या 24 तासात पुण्यातून या चार जणांना अटक करण्यात आली आहे. (Four People Arrested from pune on Kidnapping Case)

मुलुंडमध्ये राहणारे व्यापारी विरल लालन यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यावसायात मार्केटिंगचे काम करणारे रोहित बाबासाहेब घारे, महेश नारायण जोंधळे, रोहन कुमार गराडे आणि आकाश लक्ष्मण करंजावणे यांच्याकडून 5 लाख रुपये उधार घेतले होते. विरलकडे ते वारंवार पैशाची मागणी करत होते. मात्र लॉकडाऊन असल्याने माझ्याकडे पैसे नाही, असे तो त्यांना सांगत होता.

त्यामुळे त्या चार जणांनी त्याचे अपहरण करुन त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे मागण्याचा डाव रचला. यातील रोहित आणि महेशने त्याला अंधेरीला कामानिमित्त बोलावून घेतले. त्यांनी त्याला गाडीत टाकून पुण्याच्या दिशेने निघाले.

रस्त्यात त्यांना रोहन आणि आकाश येऊन मिळाले. त्यांनी विरलचे वडील राजेश लालन यांना फोन करुन पैसे देण्याची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर मुलाला मारुन टाकू अशी धमकी दिली. राजेश यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार करताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके तयार करुन तांत्रिक माहितीच्या मदतीने या आरोपींचा पाठलाग केला.

त्या चार जणांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. विरल लालन याची सुखरुप सुटका करण्यात आली. मुलुंड पोलिसांनी अवघ्या 24 तासात या अपहरणाचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (Four People Arrested from pune on Kidnapping Case)

संबंधित बातम्या : 

जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपी बोईसरमध्ये जेरबंद

कोरोना काळात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार, नवी मुंबईतून थेट दक्षिण आफ्रिकेत निर्यात

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.