जम्मू-काश्मीरच्या शोपिया येथील चकमकीत चार दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सेनेला मोठं यश प्राप्त झाल आहे. शोपिया येथे दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. काही दहशतवादी येथे लपून असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, ज्यानंतर हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. शोपिया जिल्ह्यातील कपरान बटागुंड क्षेत्रात काही दहशतवादी लपून असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. […]
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सेनेला मोठं यश प्राप्त झाल आहे. शोपिया येथे दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. काही दहशतवादी येथे लपून असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, ज्यानंतर हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं.
शोपिया जिल्ह्यातील कपरान बटागुंड क्षेत्रात काही दहशतवादी लपून असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. ज्यानंतर येथे सर्च ऑपरेशन सुरू होतं. यादरम्यान दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. या चकमकीत सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना ठार केले असून ही चकमक अजूनही सुरू आहे.
मागील शुक्रवारी शोपिया येथे अज्ञात सशस्त्र दहशतवाद्यांनी माजी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) तसेच इतर दोघांचे अपहरण केलं होतं. तर शोपिया येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या चकमकित एक जवान शहीद झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. तसेच सीमारेषेवर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं.
सीआरपीएफच्या 178 बटालियन, आरआर आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी एकत्र येत हे ऑपरेशन पूर्ण केले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.