चार वर्षाची भाची बिबट्याच्या जबड्यात; जीवाची बाजी लावून मामाने वाचवले प्राण

जिल्ह्यातील परदेशवाडी येथे बिबट्याने चार वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात एकटी खेळत असताना मुलीवर हा हल्ला झाला.

चार वर्षाची भाची बिबट्याच्या जबड्यात; जीवाची बाजी लावून मामाने वाचवले प्राण
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 5:52 PM

नाशिक : जिल्ह्यातील परदेशवाडी येथे बिबट्याने चार वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात एकटी खेळत असताना मुलीवर हा हल्ला झाला. यामध्ये मुलीच्या मामाने प्रसंगावधान दाखवल्याने मुलीचा जीव वाचू शकला. (four year old girl attacked by a leopard at Pardeshwadi in Nashik district)

मिळालेल्या माहितीनुसार, जया नावाची 4 वर्षीय मुलगी शेतात खेळत होती. तिच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने मुलीला जबड्यात पकडत बब्बल 200 ते 300 मीटरपर्यंत फरफटत नेले.बिबट्याच्या या हल्ल्यात मुलीच्या मानेवर जखम झाली आहे. मुलीचा आवाज ऐकल्यानंतर शेतात काम करणाऱ्या मुलीच्या मामाला ही घटना समजली. प्रसंगावधान दाखवत मुलीच्या मामाने बिबट्याशी दोन हात करत आपल्या भाचीला वाचवले. आपल्या भाचीला बिबट्याचा जबड्यातून सोडवले.

अचानकपणे झालेल्या या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती होताच गावातील नागरिक तसेच बाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमी मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्यांचे माणसांवरील हल्ल्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच मुलीवर झालेल्या हल्ल्यामुळे परदेशवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहेत.

संबंधित बातम्या :

पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिनाभरात 3 चिमुकल्यांचा मृत्यू, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दारु पार्टीचा आरोप

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 10 दिवसातील दुसरी घटना

(four year old girl attacked by a leopard at Pardeshwadi in Nashik district)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.