पुण्यात कोरोनाग्रस्त वाढले, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली असून राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या 42 वर गेली आहे France Return Pune Woman Corona
पुणे : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. फ्रान्स आणि नेदरलँड्सला फिरुन आलेल्या महिलेचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे. (France Return Pune Woman Corona)
संबंधित महिला 15 मार्चला फ्रान्सहून पुण्यात आली होती. काल रात्री तिचा एनआयव्हीचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात काल सकाळी (17 मार्च) 63 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू होता. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली असून राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या 42 वर गेली आहे.
पुण्यात खबरदारी
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गर्दीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसच्या दररोज 1800 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. मात्र बस वाहतुकीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी ही संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. दर 10 मिनिटांऐवजी आता 20 मिनिटानी बस स्टॉपवर बस येणार आहे.
Corona Live : पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली https://t.co/Y5eTBIYlgi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2020
कोरोनाविषयी जनजागृती झाल्यामुळे अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडणं पसंत केलं आहे. खाजगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती देणारे पुणेकर घरी राहण्यात धन्यता मनात आहेत. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. PMPML ची प्रवासी संख्या रोडावली आहेच. मात्र सार्वजनिक वाहतुकीतून ही आकडेवारी वाढू नये, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
CORONA : सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, लोकल-बस सुरुच राहणार, नाईलाज झाल्यास बंद करु : मुख्यमंत्री
गेल्या पाच दिवसांपासून पीएमपीएलचे रोजचे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु कोरोनसारखा जीवघेणा विषाणू फोफावण्यापेक्षा होणारे नुकसान परवडणारे आहे.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- पिंपरी चिंचवड – 10
- पुणे – 8
- मुंबई – 7
- नागपूर – 4
- यवतमाळ – 3
- कल्याण – 3
- नवी मुंबई – 3
- रायगड – 1
- ठाणे -1
- अहमदनगर – 1
- औरंगाबाद – 1
- एकूण 42
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
- औरंगाबाद (1) – 15 मार्च
- पुणे (1) – 15 मार्च
- मुंबई (3) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- यवतमाळ (1) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- मुंबई (1) – 17 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
- पुणे (1) – 18 मार्च
- एकूण – 42 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
- कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
- दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
- एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
France Return Pune Woman Corona