सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : दूध भुकटी अनुदान प्रकरणावरुन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख आता चांगलेच अडचणीत आलेत. लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या दूध भुकटी प्रकल्पातील अनुदान प्रकरणात खोटी कागदपत्रे सादर केल्याचा ठपका ठेवत रोहन देशमुख, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. […]

सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : दूध भुकटी अनुदान प्रकरणावरुन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख आता चांगलेच अडचणीत आलेत. लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या दूध भुकटी प्रकल्पातील अनुदान प्रकरणात खोटी कागदपत्रे सादर केल्याचा ठपका ठेवत रोहन देशमुख, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऐन अधिवेशन काळात मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल झाल्याने सहकारमंत्री देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत.

जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये 420, 465, 468 आदी कलमांतर्गत शासनाची फसवणूक करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटी कागदपत्रे शासनाला दाखल करुन शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत सदर बाझार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्हच्या वतीने राज्याच्या दुग्ध विकासाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्यात लोकमंगलकडे असलेल्या दुग्धशाळेचा विस्तार म्हणून 50 हजार लिटरवरून एक लाख लिटर दूध करण्याचा प्रस्ताव होता. सोबत 10 मेट्रिक टन दूधभुकटी निर्मिती प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार होती. त्यासाठी सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावासोबत विविध परवाने, लोकमंगल दूध संस्थेतील संकलन याबाबतची कागदपत्रे जोडली होती.

एकूण 24 कोटी 81 लाख रुपयांचा हा प्रस्ताव  होता. शासकीय स्तरावर हा प्रस्ताव मंजूर होऊन दोन टप्प्यात पाच कोटी रुपयांचे अनुदानही अदा करण्यात आले. मात्र, दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पाराव कोरे यांनी माहितीच्या अधिकारात प्रस्तावातील कागदपत्रे मिळवली.

सरकारकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये बनाव झाल्याचा प्रकार त्यातून उघडकीस आला. ही बाब त्यांनी दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लोकमंगलला मंजूर झालेली रक्कम अदा न करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. कोरे यांच्या तक्रारींवर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय खात्याच्या प्रधान सचिवांनी सुनावणी ठेवली. लोकमंगल मल्टिस्टेटचे म्हणणे घेतले. त्यानंतर सकृतदर्शनी कागदपत्रात बनाव झाल्याचं समोर आलंय.

या प्रकरणाची कुणी दाद घेत नसल्यामुळे तक्रारदार कोरे यांनी लोकायुक्तांकडे अधिकारी, सचिव आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्या विरोधात तक्रार केली होती.  त्यामुळे आज मंत्री महादेव जानकर आणि सर्व अधिकारी सुनावणीसाठी हजार होते. या सर्वांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.