शेतमालाला जास्त भाव देण्याचं आमिष, शेतकऱ्याला 19 लाखांचा गंडा, भामट्याला बेड्या

शेतमालाला जास्त भाव देण्याचं आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.

शेतमालाला जास्त भाव देण्याचं आमिष, शेतकऱ्याला 19 लाखांचा गंडा, भामट्याला बेड्या
Follow us
| Updated on: Sep 15, 2020 | 4:19 PM

कल्याण : शेतमालाला जास्त भाव देण्याचं आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या (Fraud With  Farmers In Kalyan) एका भामट्याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अस्लम शेख असे या भामट्याचे नाव असून त्याने राज्यातील किती शेतकऱ्यांना फसवले आहे, त्याचा तपास पोलीस करत आहेत (Fraud With  Farmers In Kalyan).

सद्य परिस्थितीत शेतकरी त्रस्त असतानाचा कल्याणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये राहणारा अस्लम शेख हा भामटा शेतकऱ्यांकडून विविध फळे 10 रुपये जास्त किलो भावाने घेऊन विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात फळे घेऊन शेतकऱ्यांना चेक द्यायचा.

हे चेक बँकेत बाऊन्स झाले. जुन्नर येथील शेतकरी संतोष भोरकडून अस्लम ने 19 लाखांचा माल घेऊन चेक दिले. चेक बाऊन्स झाल्याने भोर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांना तपास दिला. या तपासात भयानक वास्तव समोर आले. कल्याणमध्ये राहणाऱ्या अस्लम याच्या विरोधात राज्यातील काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारे फसवले आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Fraud With  Farmers In Kalyan

संबंधित बातम्या :

उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुलगी बेपत्ता, तब्बल नऊ महिन्यानंतर खुनाचा उलगडा, नातेवाईकांना अटक

अंगणवाडी सुपरवायझरकडून पोषण आहाराची अफरातफर, डोंबिवलीत धान्याच्या टेम्पोसह महिला रंगेहाथ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.