40 रुपयांसाठी मित्राचा गळा दाबला; तरुणाचा गुदमरुन मृत्यू, कोल्हापुुरातील धक्कादायक घटना

केवळ चाळीस रुपयाची उधारी वसूल करण्याच्या कारणावरुन एकाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.

40 रुपयांसाठी मित्राचा गळा दाबला; तरुणाचा गुदमरुन मृत्यू, कोल्हापुुरातील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 5:29 PM

कोल्हापूर : केवळ चाळीस रुपयाची उधारी वसूल करण्याच्या कारणावरुन (Friend Killed Friend For 40 Rs) मित्राची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. इचलकरंजीतील करवीर तालुक्यात ही घटना घडली. येथील अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे (वय 28) या तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. वसगडे तालुका करवीर येथे काल रात्री उशिरा घडली. या प्रकरणातील संशयित आरोपी जगदीश कांबळे याला गांधीनगर पोलीसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे (Friend Killed Friend For 40 Rs).

करवीर तालुक्यातील वसगडे येथे राहणारा अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे (वय 28) आणि जगदिश नायकु कांबळे (वय 27) हे दोघे मित्र होते. नेहमीप्रमाणे काल रात्री ते समाजमंदिरात दारु पित बसले होते. अनिल कांबळे हा जगदीश कांबळे याचे 40 रुपये देणे लागत होता. ती रक्कम जगदीश परत मागत होता. यामुळे दोघांत वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

जगदीश कांबळेने गळा आवळल्याने अनिल कांबळेचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला. तो निपचिप पडल्यानंतर जगदीश घटनास्थळावरुन पसार झाला. ही घटना समजताच काही युवक आणि नातेवाईकांनी समाजमंदिरात धाव घेतली. त्यांनी तात्काळ अनिलला गांधीनगर इथल्या वसाहत रुग्नालयात दाखल केलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

याबाबतची माहिती गांधीनगर पोलिसांना कळताच त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला रवाना केला आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कृष्णात पिंगळे यांनी फरार संशयित जगदीश कांबळेला गावातूनच ताब्यात घेतले आहे.

Friend Killed Friend For 40 Rs

संबंधित बातम्या :

ATM फोडणाऱ्या टोळीकडे ट्रक सापडला, पोलीस हैराण, नागपूर पोलिसांची मोठी 

दारुच्या नशेत सतत आईला मारहाण, लातुरात मुलांकडून पित्याची हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.