भारतासोबत ऑक्टोबरमध्ये आर-पार युद्ध होईल : पाकिस्तान रेल्वे मंत्री

शेख रशीद अहमद यांनी पुन्हा एकदा नवं भाकीत (Pakistan Railway Minister) केलंय. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात आर-पार युद्ध होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

भारतासोबत ऑक्टोबरमध्ये आर-पार युद्ध होईल : पाकिस्तान रेल्वे मंत्री
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 9:05 PM

रावळपिंडी, पाकिस्तान : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्यापासून शेजारील देश पाकिस्तानचा थयथयाट झालाय. पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी (Pakistan Railway Minister) भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आणि लंडनमध्ये त्यांची अंड्यांनी धुलाई करण्यात आली. आता शेख रशीद अहमद यांनी पुन्हा एकदा नवं भाकीत (Pakistan Railway Minister) केलंय. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात आर-पार युद्ध होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

काश्मीर प्रश्नी जे योग्य असेल ते मोदीच करतील : डोनाल्ड ट्रम्प

रावळपिंडीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी युद्धाची भविष्यवाणी केली. शेख रशीद अहमद हे नेहमीच भारतविरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. त्यानंतर ते ब्रिटनला गेले आणि तिथे त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.

काश्मीर सोडा, मुजफ्फराबाद वाचवा, इम्रान खानला घरचा आहेर

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीला काश्मीर प्रश्न खरंच सोडवायचा असेल तर त्यांनी जनमत घ्यावं. आम्ही काश्मीरच्या लोकांसोबत असून लवकरच काश्मीरला भेट देणार आहे, असंही शेख रशीद अहमद म्हणाले.

इम्रान खानचा थयथयाट, भारताला अणुयुद्धाची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे काश्मीर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, पण पाकिस्तान त्यांच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. उर्वरित मुस्लीम राष्ट्र या मुद्द्यावर शांत का आहेत? मोहम्मद अली जिन्ना यांनी यापूर्वीच भारताची मुस्लीम विरोधी भूमिका ओळखली होती. यानंतरही आज जे चर्चेतून मार्ग निघेल अशी अपेक्षा करत असतील, ते मूर्ख आहेत, असंही शेख रशीद अहमद म्हणाले.

दरम्यान, काश्मीर प्रश्नावर जगातील जवळपास सर्व देशांनी हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. विशेष म्हणजे या मुद्द्यावर मुस्लीम राष्ट्रांनीही पाकिस्तानला साथ दिली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या मंत्र्यांचा आणखी संताप झालाय. एकीकडे काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान जगभरात मदत मागत आहे, तर दुसरीकडे मुस्लीम राष्ट्र संयुक्त अरब अमिरातीने आपला सर्वोच्च नागरी सन्मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.