आंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रोपोलीन गॅसचा टँकर आणि एका क्रेनमध्ये भीषण अपघात झाला आहे (Gad Tanker and Crane Accident on Mumbai Ahmedabad Highway Palghar).
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रोपोलीन गॅसचा टँकर आणि एका क्रेनमध्ये भीषण अपघात झाला आहे (Gad Tanker and Crane Accident on Mumbai Ahmedabad Highway Palghar). रात्री 12 वाजेची दरम्यान महामार्गावरील आंबोली येथे हा अपघात झाला. यानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अपघातामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या अपघातानंतर घटनास्थळावर वाहतूक पोलीस दाखल झाले आहेत. त्यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ठप्प झालेली वाहतूक महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन संथगतीने सुरु करण्यात आली आहे.
प्रोपोलिन गॅस टँकर क्र. जी. जे. 06 ए. झेड. 6989 गुजरातकडे जात असताना टँकरने आंबोली ब्रिजवर क्रेनला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. तसेच रस्ताही ब्लॉक झाला. अपघातामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलिसांकडून उपाय म्हणून वाहतूक वळवण्यात आली आहे.
महामार्गावरील अशा घटना दैनंदिन झाल्या आहेत. चारोटी ते आच्छाडपर्यंत असलेले अनावश्यक कट, नागमोडी वळण , ब्रिज यामुळे अपघात घडून अनेकांचे जीव जात आहेत. अपघात झालेला टँकर काढण्यासाठी आणखी 4 ते 5 तास लागणार आहेत. गॅस कंपनीचे टेक्निशियन आल्यानंतर टँकर हटवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील कट बंद करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र महामार्गाचे काम पाहणारी आय. आर. बी. कंपनीकडून याकडे मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा :
कुलर सुरु करताना शॉक, एकमेकींना वाचवताना तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू
Mumbai Traffic Jam | मुंबईतील वांद्रे पुलावर कंटेनर फेल, पश्चिम द्रुतगती मार्ग जॅम
व्हिडीओ पाहा:
Gad Tanker and Crane Accident on Mumbai Ahmedabad Highway Palghar