गडचिरोलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, मुंबई-पुण्यातून आलेल्या 26 जणांना लागण

लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून ग्रीन झोन असलेल्या (Gadchiroli Corona Cases Update) गडचिरोलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

गडचिरोलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, मुंबई-पुण्यातून आलेल्या 26 जणांना लागण
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 7:00 PM

गडचिरोली : लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून ग्रीन झोन असलेल्या (Gadchiroli Corona Cases Update) गडचिरोलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गडचिरोली जिल्हा 18 मे पर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. मात्र मुंबई पुणे या शहरातील काही जणांनी जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर गडचिरोलीत कोरोनाची लागण झाली सुरु झाली. गडचिरोलीत काही दिवसांपूर्वी 4 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आता हा आकडा 26 वर पोहोचला आहे.

गडचिरोलीतील कोरोनाबाधितांची संख्या ही 26 वर पोहोचली आहे. हे सर्व रुग्ण मुंबई-पुण्यातून आलेले आहे. सुदैवाने त्यांच्या संपर्कात आलेले 571 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच हे आकडे अजून वाढू नये याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेले पहिले तिन्ही रुग्ण हे मुंबईवरुन आलेले आहे. सतत वाढत जाणाऱ्या रुग्णांमुळे गडचिरोली जिल्ह्याला ग्रीन झोनमधून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रत्येकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई-पुण्यातून अनेकजण गावी जाण्यासाठी परवानगी मिळवत आहेत. पण या शहरातून जाणाऱ्या नागरिकांमुळे खेडे गावात कोरोना पोहोचत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात मुंबई-पुण्यावरुन आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच 

राज्यात कालच्या दिवसात 2091 नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 97 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 वर पोहोचली आहे. काल 1168 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 954 इतकी झाली आहे. सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु (Gadchiroli Corona Cases Update) आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी अहमदनगरची चिंता वाढवली, जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित

Corona | अलिबागमध्ये एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटिव्ह

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.