सांगली : राज्यात संचारबंदी असतानाही सांगलीतील मिरजमध्ये मात्र जुगार अड्ड्यावर जुगार सुरु (Gambling during lockdown at sangli) असल्याचे समोर आलं आहे. या जुगार अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी छापा घातला. यावेळी जुगार खेळणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मिरजेतील गुरूवार पेठ येथील घटना घडली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे (Gambling during lockdown at sangli) राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसेच सर्व जिल्ह्यातही संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीही मिरजेतील गुरुवार पेठेतील घोडीमार वाडा येथे एका घरातच भर दुपारी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. ही माहिती मिळताच मिरज पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली.
यात दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 18 हजार 590 रुपयाची रोख रक्कम, 5 मोबाईल आणि 2 मोटारसायकल असा एकूण 1 लाख 4 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्यात कोरोनाचे 1 हजार 380 रुग्ण
दरम्यान, आज (10 एप्रिल) महाराष्ट्रात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत (Gambling during lockdown at sangli)) आहे.