नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, हे काही सांगता येत नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही युझर्सने आपलं एखादं म्हणणं मांडावं आणि ते काही लोकांना पसंत पडावं. झालंच तर मग… त्यापाठीमागून अनेक लोक त्या विषयांवर वेगवेगळे ट्विट करतात, तश्या पोस्ट शेअर करतात. आताही असाच प्रकार पाहायला मिळतोय. एका महिला शेतकरी नेत्याचा आंदोलनादरम्यान सँडल गायब झाल्यानंतर तिने सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. ह्याच आरोपांना घेऊन सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला आहे. (Geeta Bhati ka sandal Wapas karo memes And jokes trending Social Media)
सोशल मीडियावर महिला शेतकरी नेत्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिला नेत्या गीता भाटीचा सँडल गायब झाला आहे. त्यानंतर गीता भाटीने सरकार आणि पोलिसांवर आरोप करताना म्हटलं आहे, “सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा”. गीता भाटीच्या हास्यास्पद आरोपानंतर ट्विटरवरील युझर्सने #’गीता भाटी का सँडल वापस करो’ नावाने ट्रेंड केला आहे.
“सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा”, अशा आशयाचं गीताचं ट्विट युझर्सने जोरदार व्हायरल केलं आहे. तसंच ते व्हायरल करताना त्याच्यावर जोक्स आणि मिम्स बनवले आहेत. हेच जोक्स आणि मिम्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतायत. अनेकांना यामुळे हसू अनावर होतंय.
NIA officers preparing list of people to be interrogated for finding stolen sandals…#गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो pic.twitter.com/lOaaNIechQ
— kidzone (@pinku_046) December 7, 2020
— fariyad khan (@fariyadkhanbain) December 7, 2020
This is not acceptable Pls keep politics aside, and ? #गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो pic.twitter.com/WRTFSG9iN7
— Trend Around Us (@trendarounduss) December 7, 2020
Sandals be like pic.twitter.com/twpELPh649
— Swati…? (@Swatisahu08) December 7, 2020
किसान आंदोलन ने पकड़ा भयानक स्वरूप,
किसानों ने कहा, “चाहे बिल वापस ना लो, पर जल्दी से #गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो ” pic.twitter.com/7Y90RClWLh— Jainam Hemani?? (@HemaniJainam) December 7, 2020
आज न्याय के लिये आवाज नही उठाई तो कल को आपके भी “सैंडल” गायब हो सकते हैं..!!
✋????#गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो
— योद्धा सत्यम गुप्ता ♕ ?ℙℕ (@Gupta_yodha) December 7, 2020
Huge support for geeta ji in LA.. #गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो pic.twitter.com/h2wQyOQ7P4
— imsarthak@18 (@imsarthak_18) December 7, 2020
एका युझर्सने ट्विट करत म्हटलं आहे की, “चोरी झालेला सँडल शोधण्यासाठी एनआयईची टीम संशयास्पद लोकांची यादी तयार करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल. तर दुसऱ्या युझर्सने पूजा भाटीला शालजोडीतून टोमणा लगावताना म्हटलं आहे, “पूजा भाटीचा सँडल चोरीचा प्रश्न हा जागतिक मुद्दा आहे. तो आता जागतिक स्तरावर चर्चेला जाणार आहे. त्यावर जगभरातून आवाज उठेल”. तर तिसऱ्या युझर्सने म्हटलंय, “आमची तर स्पेशल मागणी आहे की या विषयी सीबीआयकडून सविस्तर चौकशी केली जावी”.
(Geeta Bhati ka sandal Wapas karo memes And jokes trending Social Media)
संबंधित बातम्या
Sunglass Trend | चेहऱ्यानुसार वापरा गॉगल्स, कोणत्या चेहऱ्यासाठी कोणता ट्रेंड?
Photo : रेट्रो इज इन द ट्रेंड, पाहा सोनाली कुलकर्णीचा रेट्रो अंदाज