पुणे : हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत (Pune girl student rape case) आहे. ही घटना ताजी असताना पुण्यात एका विद्यार्थिनीवर अॅसिड टाकण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आला आहे. शाळेच्या समुपदेशन दरम्यान हा प्रकार समोर आला. यानंतर पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली असून या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही कोरेगाव पार्क या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे. ती मुलगी आणि आरोपी हे दोघेही पूर्वी एकाच ठिकाणी राहत होते. मात्र आता हा आरोपी दुसऱ्या ठिकाणी राहतो. हा आरोपी पीडित मुलीचा शाळेत जाताना पाठलाग करायचा.
तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकेन, तुझ्या घरच्यांना मारेन अशी धमकी आरोपीनी मुलीला दिली होती. तू मला एकदा भेट, मग मी तुला त्रास देणार नाही, असे धमकावत त्याने तिला गाडीवर बसवलं. त्यानंतर निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार करुन व्हीडिओ (Pune girl student rape case) बनवला.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला देत होता. शाळेच्या काऊन्सिलिंग दरम्यान हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान हा आरोपी सराईत रेपीस्ट असून त्याने यापूर्वीही बलात्कार केला आहे. सध्या तो जामीनावर सुटला होता. जामीनावर असताना त्यानं पीडितेवर अत्याचार केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणी न्यायलयाने 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली (Pune girl student rape case) आहे.