Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, सोन्याच्या किमतीत पाच दिवसात तब्बल 5 हजारांची घसरण
जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक ‘गुड न्यूज’ (Gold Price Today Decrease) आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला (Gold Price Today Decrease) भिडले होते. मात्र, जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. कारण सोन्याच्या भावात 5 हजारांची घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसातील सोन्याच्या भावात ही घसरण पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रतितोळा 39 हजार 225 रुपये इतका पाहायला मिळत आहे.
कोरोना व्हायरसमुळे शेअर मार्केटमध्ये (Gold Price Today Decrease) अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण होतं आहे.
Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण
आंतरराष्ट्रीय स्तरावर मंगळवारी सकाळी सोन्याचा भाव 0.79 टक्क्यांनी म्हणजेच 11.95 डॉलरने घसरला. त्यामुळे मंगळवारी (17 मार्च) सोन्याच्या भावात 480 रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे भारतात सोन्याचा भाव 39 हजार 037 रुपये प्रति 10 ग्रॅम पाहायला मिळाला. गेल्या पाच दिवसात सोन्याच्या किंमती तब्बल 5 हजारांनी घसरल्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी 44 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम विक्री होणारे सोन्याच्या किंमती आता घसरल्या आहेत. तर चांदींच्या किंमतीतही घट पाहायला मिळत आहे.
मंगळवारी चांदीचा भाव 1.04 टक्क्यांनी घसरुन 35 हजार 831 रुपये प्रति किलो पाहायला मिळाला.
कोरोना संसर्गाने तमाशाही अडचणीत, सुपाऱ्या रद्द झाल्यानं कोट्यावधींचा फटका
‘या’ कारणामुळे सोन्याच्या किमतीत घसरण?
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या कारणामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालट होताना दिसत आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. कोरोना व्हायरसमुळे सोने-चांदीवर परिणाम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ग्राहकही सोने-चांदी खरेदी करण्यास तयार नाहीत. सोन्याची मागणी कमी झाल्याने सोनं स्वस्त झालं (Gold Price Today Decrease) आहे.
सोन्याच्या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता
HDFC सिक्युरिटीजचे समीक्षक तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने देशातील सोन्याच्या किंमतींवर त्यांचा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या (Gold Rate Fall) किंमती आणखी घसरु शकतात.
संबंधित बातम्या :
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, सोन्याचा भाव घसरला
Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे