पाच लाख गुंतवून १५ लाख कमविण्याची सुवर्णसंधी, पोस्ट ऑफीसची योजना एकदम भारी
बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर, आजच्या युगात पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करावा लागतो. मुलाचा जन्म झाल्यापासून पालकांना पैसे बाजूला काढुन आर्थिक नियोजन करावे लागते. तुमचे पैसे सुरक्षित ठेवून त्यावर परतावा मिळण्यासाठी पोस्ट ऑफीसची एफडी एक चांगला पर्याय आहे.पोस्ट ऑफीसची योजना तुम्हाला कमी वेळेत जास्त परतावा मिळवून देते...
मुलांच्या भविष्यासाठी अनेक पालक विविध योजनात पैसे गुंतवतात. पीपीएफ, आरडी, सुकन्या सारख्या योजनेत अनेक पालक गुंतवणूक करतात. याशिवाय काही लोक भविष्याची गरज करण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट्स योजनेत एकरकमी रक्कम जमा करण्याची योजना आखतात. आज तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या एका योजनेबद्दल माहीत देणार आहोत. ही योजना कमी कालावधीत जादा परतावा देते. या योजनेत पाच लाखांचे पंधरा लाख रुपयांत रुपांतर करते. पोस्ट ऑफिसाची योजना कमालीची आहे. सर्वसामान्यात ही योजना खूप लोकप्रिय आहे.
पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट्स योजनेत पैसा लावा
जर तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे तर पोस्ट ऑफीसची टर्म डिपॉझिट्स योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस एफडी योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफीसच्या या योजनेत पाच वर्षांच्या एफडीवर चांगले रिटर्न मिळत आहे.ही योजना बँकापेक्षा जास्त व्याज देते. या योजनेद्वारे रकमेला तीन पट जास्त करु शकता. जर तुम्ही पाच लाखांची गुंतवणूक केली तर १८० महिन्यात तुम्ही १५ लाख प्राप्त करु शकता. चला तर पाहूयात ही योजना कशी काम करते…
असे होणार ५ लाखांचे १५ लाख रुपये
पाच लाखांचे पंधरा लाख करण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी पोस्ट ऑफीसच्या एफडीत गुंतवण्याची गरज आहे. पोस्ट ऑफीसच्या ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे. पाच वर्षांनंतर मॅच्युरिटी अमाऊंट वाढवून ७,२४,९७४ रुपये होतील. परंतू ही रक्कम काढता येणार नाही. तर ही रक्कम पाच वर्षांसाठी पुन्हा गुंतवावी लागणार आहे. यानंतर १० वर्षांनंतर तुम्हाला ५ लाखांची रक्कम व्याजाच्याद्वारे ५,५१,१७५ रुपये मिळतात. आणि तुमची रक्कम १०,५१,१७५ रुपये होते.
यानंतर पुन्हा एकदा ही रक्कम पाच वर्षांसाठी फिक्स करावी लागणार आहे. म्हणजे यास ५-५ वर्षांसाठी दोनदा फिक्स्ड करावी लागणार आहे. यानंतर ही रक्कम एकूण १५ वर्षांसाठी जमा राहील. या १५ व्या वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला पाच लाखाच्या गुंतवणूकीतून व्याजाद्वारे १०,२४,१४९ रुपये मिळणार आहे. तुम्हाला एकूण १५,२४,१४९ रुपये मिळणार आहे. सोप्या भाषेत समजायला असेल तर ५ लाखांहून १५ लाख बनविण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या एफडीला दोन वेळा मुदतवाढ द्यावी लागणार आहे.यासाठी काही नियम आहेत. जे तुम्हाला समजावे लागणार आहे.
पोस्ट ऑफीसचे एफडी व्याज दर
बँकांसारखे पोस्ट ऑफीसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अवधीसाठी एफडीचे पर्याय आहेत. या अवधीसाठी वेगवेगळे व्याज दर मिळतात. पोस्ट ऑफीसच्या सध्याचे व्याज दर अशा प्रकारे आहे.
एक वर्षांचे खाते ६.९ % वार्षिक व्याज
दोन वर्षीय खाते ७.० % वार्षिक व्याज
तीन वर्षीय खाते ७.१% वार्षिक व्याज
पाच वर्षीय खाते ७.५ % वार्षिक व्याज