गोंदिया : कोरोना विषाणूमुळे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 30 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. येत्या 1 नोव्हेंबरपासून व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन पुन्हा सुरु होणार आहे. मात्र केवळ 50 टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना, पर्यटन पुन्हा सुरु होणार असल्यामुळे गाईड आणि जिप्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. (Gondia Navegaon National Park Tourism will resume)
विदर्भातील ताडोबाप्रमाणेच गोंदिया येथील नवेगाव/नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन स्थळ प्रचंड प्रसिद्ध आहे. ताडोबाप्रमाणे पर्यटक नेहमीच या ठिकाणी आकर्षित होत असतात. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
मात्र कोरोना काळात हे पर्यटनस्थळ 30 जूनपर्यंत पूर्णत: बंद होते. अचानकपणे उद्भवलेल्या या स्थितीनंतर या ठिकाणी असलेल्या गाईड आणि जिप्सी चालकांचा रोजगार पूर्णतः ठप्प झाला होता. त्यामुळे पर्यटन सुरु होणार नाही अशी भीती अनेकांना वाटू लागली होती. मात्र आता येत्या 1 नोव्हेंबरपासून पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे स्थानिकांना कमी प्रमाणात का होईना त्यांना रोजगार प्राप्त होणार आहे.
नवेगाव नागझिरा अभयारण्यात 200 हून अधिक विविध प्रकारचे पक्ष्यांसोबतच विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्याशिवाय या अभयारण्यातील जैवविविधता लक्षात घेता अनेक पर्यटक अभ्यास करण्याकरिता येथे भेट देत असतात.
सद्यस्थितीत ऑनलाईन बुकिंग सुरु झाली आहे. त्या उपलब्धतेनुसार ऑफलाईन पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच वाहनचालकासह पर्यटकांना मास्कचा वापर करणे गरजेचे असणार आहे.
पण 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांहून अधिक वयाच्या पर्यटकांना नवेगाव नागझिरा अभयारण्यात फिरण्यात अजूनही वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे एकंदरीतच उशिरा का होईना सुरु होणाऱ्या पर्यटकांमुळे येथील स्थानिकांना पुन्हा एकदा त्यांना रोजगार प्राप्त होणार आहे. (Gondia Navegaon National Park Tourism will resume)
संबंधित बातम्या :
आता दिवाळीपर्यंत स्वस्तच मिळतील भाज्या, असे असतील नवे भाव
विदर्भातील काश्मिरात धुक्याची चादर, चिखलदरा पर्यटकांनी फुलले