डोक्यावर 12 लाखांचं बक्षीस, जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला 10 वर्षांनी अटक

गोंदिया पोलिसांनी तब्बल 10 वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला मोठ्या शिताफीने छत्तीसगढ राज्यातून अटक केली आहे.

डोक्यावर 12 लाखांचं बक्षीस, जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला 10 वर्षांनी अटक
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 10:53 PM

गोंदिया : गोंदिया पोलिसांनी तब्बल 10 वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला मोठ्या शिताफीने छत्तीसगढ राज्यातून अटक केली आहे. या जहाल नक्षलवाद्याचे नाव रमेश मडावी असं आहे. या नक्षलवाद्याच्या डोक्यावर महाराष्ट्र सरकारने 12 लाख रुपयांचं बक्षीस देखील ठेवलं होतं (Gondia Police arrest most wanted Naxalite Ramesh Madavi in Chhattisgarh ).

रमेश मडावी 1998-99 मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला होता. यानंतर त्याने गोंदिया जिल्ह्यात अनेक मोठ्या नक्षली घटना घडवून आणल्या. देवरी नक्षल दलममध्ये त्याची वर्णी एसी. एम. एल. ओ. एस. कमांडर म्हणून देखील लागली होती. देवरी दलममध्ये असताना आरोपी रमेशने चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मगरडोह हद्दीमध्ये पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला केला होता.

या परिसरात नागरिकांच्या हत्या, गावकऱ्यांवर हल्ले करणे, सार्वजनिक मालमतेची नासधूस करणे अशा विविध घटनांमध्ये रमेश मडावी याचा सहभाग होता. त्याच्यावर याआधी देखील 13 गुन्हे दाखल आहेत. रमेश मडावी हा छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात वावरत असल्याची गुप्त माहिती गोंदिया पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे गोंदिया पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील पोलिसांच्या सहकार्याने सुकमा जिल्ह्यात जाऊन रमेश मडावीला अटक केली. या अटकेला गोंदिया पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. पोलीस उपाधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कारवाईसाठी पोलीस दलाचे कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या : 

नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्याकडेही अत्याधुनिक शस्र, गृहमंत्र्यांचा इशारा

गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा, एकनाथ शिंदेंकडून जवानांचं कौतुक

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण

व्हिडीओ पाहा :

Gondia Police arrest most wanted Naxalite Ramesh Madavi in Chhattisgarh

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.