हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास लायसन्स रद्द, गडकरींच्या विधेयकातील कठोर नियम

18 वर्षाखालील म्हणजेच अल्पवयीन तरुण-तरुणी गाडी चालवताना आढळल्यास त्या गाडीचा मालक किंवा पालकांना दोषी ठरवण्यात येणार आहे. त्याशिवाय वाहनाचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे.

हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास लायसन्स रद्द, गडकरींच्या विधेयकातील कठोर नियम
Follow us
| Updated on: Jun 25, 2019 | 7:57 PM

नवी दिल्ली : अनेकदा रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यास तुम्हाला किमान 500 ते 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो. मात्र आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहा पट जास्त दंड आकारण्यात येणार आहे. नुकतंच याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत सादर करण्यात आला आहे. तसेच रुग्णवाहिका किंवा इतर महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न दिल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  मोटर वाहन (संशोधन) या विधेयकाला मंजूरी दिली आहे.

मोदी सरकारने याआधी वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम दुप्पटीने वाढवली होती. मात्र त्यानंतर रस्ते अपघात आणि वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. हे लक्षात घेता, मोदी सरकारने निवडून आल्यानंतर या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार दंडाच्या रक्कमेत दहा पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  मोटर वाहन (संशोधन) या विधेयकाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर हे विधेयक आता लोकसभेत सादर केले जाणार आहे. लोकसभेत या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मंजुरीसाठी जाईल आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला,उबर यांसारख्या खासगी वाहन चालकांनी वाहन परवान्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना तब्बल 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वेगाने गाडी चालवल्यास 1000 ते 2000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

त्याशिवाय इन्शुरन्सशिवाय वाहन चालवल्यास 2000 रुपयांचा दंड, हॅल्मेट न घातल्यास किंवा सीट बेल्ट न लावल्यास 1000 रुपये आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. तसेच 18 वर्षाखालील म्हणजेच अल्पवयीन तरुण-तरुणी गाडी चालवताना आढळल्यास त्या गाडीचा मालक किंवा पालकांना दोषी ठरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा वाहनाचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय तीन वर्षाचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान वाहतुकीचे नियम तोडल्यास आता 100 रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र आता त्यात वाढ करण्यात येणार असून वाहतुकीचे नियम मोडल्यात तुम्हाला 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच प्रशासनाचा हा आदेश न मानल्यास तुम्हाला 500 रुपयांऐवजी 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

वेगात गाडी चालविल्यास 1000 ते 2000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर ओव्हरलोडिंगसाठी 20 हजार रुपये दंड आकारला जाईल. लवकरच या विधेयकाला संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

काय आहे नवीन विधेयकात?

  • हिट अँड रन सारख्या प्रकरणात आढळल्यास वाहन चालकाला आता 25 हजारांऐवजी 2 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे
  • 18 वर्षाखालील म्हणजेच अल्पवयीन तरुण-तरुणी गाडी चालवताना आढळल्यास त्या गाडीचा मालक किंवा पालकांना दोषी ठरवण्यात येणार आहे. तसेच गाडी चालवणाऱ्या तरुण किंवा तरुणीवर juvenile justice act नुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याशिवाय अशा वाहनाचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे.
  • दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच त्या व्यक्तीला जेलचीही हवा खावी लागेल.
  • वेगाने गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
  • लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
  • वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास 2 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे
  • सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.
  • चालकाच्या लायसन्स आणि गाडीच्या रजिस्ट्रेशनमध्ये आधार कार्ड नंबर अनिवार्य करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : 

नितीन गडकरींचा मोठा निर्णय, ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची किमान शैक्षणिक मर्यादा रद्द

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.