Work From Home | पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ला मुदतवाढ
आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास दिलेल्या सवलतीत आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास दिलेल्या सवलतीची मुदत वर्षअखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयटी कर्मचारी आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत घरुन काम करु शकतील. त्यामुळे आता थेट पुढच्या वर्षी ऑफिसला जावे लागू शकते. (Government extends Work from Home norms for IT BPO Companies till December 31st)
आयटी कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट देण्याच्या सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या होत्या. हा कालावधी संपत आल्याने थेट आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“कोविड19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत दूरसंचार मंत्रालयाने अन्य सेवा प्रदात्यांना अटी व शर्तींमध्ये दिलेल्या सवलती 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवल्या आहेत.” असे ट्वीट दूरसंचार मंत्रालयाने केले आहे.
Once again a big thank you from the IT fraternity to @DoT_India @GoI_MeitY @rsprasad for extending the OSP relaxations.
Great step to ensure business operates seamlessly in the current environment. pic.twitter.com/EID8HGC8dU
— CP Gurnani (@C_P_Gurnani) July 22, 2020
सध्या आयटी कर्मचार्यांपैकी जवळजवळ 85 टक्के घरुन काम करत आहेत, तर केवळ जिकिरीचे काम करणारे कर्मचारी कार्यालयात जात आहेत. काही ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, तर काही ठिकाणी रोटेशननुसार एक आड एक आठवडा कर्मचाऱ्यांना बोलवले जाते. बाहेरगावी राहणारे बहुतांश कर्मचारी आपल्या घरी कुटुंबियांजवळ आहेत. कोणी प्रियजनांसोबत राहता येत असल्याने आनंदात आहे, तर बऱ्याच जणांना मात्र वाढलेल्या कामाचा तापच होत आहे.
DoT has further extended the relaxations in the Terms and Conditions for Other Service Providers (OSPs) upto 31st December 2020 to facilitate work from home in view of the on going concern due to #COVID19.
— DoT India (@DoT_India) July 21, 2020
कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत. सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत दिलेली मुभा नंतर 31 जुलै आणि आता थेट 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. (Government extends Work from Home norms for IT BPO Companies till December 31st)
संबंधित बातमी
आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा