Gram Panchayat Election | इकडे शिंदे-ठाकरेंत जुंपली, तिकडे परभणीच्या गावात भाजपा-राष्ट्रवादीची युती, मेघना बोर्डीकरांच्या नेतृत्वात एकहाती विजय

परभणीतील ब्राह्मण गाव-डुघरा येथेदेखील ग्रामविकास पॅनलचा विजय होताना दिसतोय. ग्रामपंचायतीत 4 सदस्य यापूर्वी बिनविरोध आले होते. (त्यात भाजप 2, राष्ट्रवादी -02). आज झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे 3 सदस्य निवडून आलेत.

Gram Panchayat Election | इकडे शिंदे-ठाकरेंत जुंपली, तिकडे परभणीच्या गावात भाजपा-राष्ट्रवादीची युती, मेघना बोर्डीकरांच्या नेतृत्वात एकहाती विजय
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 12:45 PM

परभणीः राज्यात भाजप, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस असा सत्ता संघर्ष सुरु असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरोधात एकनाथ शिंदेंचा संघर्ष पहायला मिळतोय. महाविकास आघाडीनेदेखील (Mahavikas Aghadi) अनेक ठिकाणी आपली गावं ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तर परभणीत काही वेगळंच चित्र दिसतंय. सेलू तालुक्यातल्या राजेवाडी गावात चक्क भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (BJP- NCP) समर्थकांनी युती केली. भाजप आमदार मेघना बोर्डीकर आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या समर्थकांनी एकत्र येत राजेवाडीत पॅनल उभे केले. या पॅनलने एकहाती विजय मिळवल्याचे चित्र सध्याच्या मतमोजणीनंतर दिसत आहे. त्यामुळे एकिकडे शिवसेनेतील उभ्या फुटीचा फटका कुठे कुठे बसतोय, याकडे सर्वांचं लक्ष आहे तर दुसरीकडे परभणीतल्या भाजप-राष्ट्रवादीच्या युतीचीही जिल्हाभरात चर्चा होतेय.

राजेवाडीत भाजप-राष्ट्रवादीचे पॅनल

सेलू तालुक्यातल्या राजेवाडी या ग्रामपंचायतीत चक्क भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी विजय देखील मिळवला आहे. राजेवाडी येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्राम विकास पॅनल स्थापन करण्यात आला. भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या समर्थकांनी या निवडणुकीत युती करत एक हाती विजय मिळवला. दरम्यान, या युतीची तालुक्यासह जिल्ह्यात सध्या चर्चा रंगत आहे.

ब्राह्मण गावातही युतीचा विजय

ब्राह्मण गाव-डुघरा येथेदेखील ग्रामविकास पॅनलचा विजय होताना दिसतोय. ग्रामपंचायतीत 4 सदस्य यापूर्वी बिनविरोध आले होते. (त्यात भाजप 2, राष्ट्रवादी -02). आज झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे 3 सदस्य निवडून आलेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे -2 आणि भाजप-1 एक उमेदवार विजयी झाला आहे.

औरंगाबादेत शिंदे सेनेला कौल

  •  औरंगादमध्ये सर्वात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर आमदार संजय शिरसाट यांचे वर्चस्व कायम राहिल्याचे चित्र सुरुवातीला दिसत आहे. शिंदे गटाच्या पॅनलमधील पाच उमेदवार येथे विजयी झाल्याचे चित्र आहे.
  •  अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातही शिंदे गटाने झेंडा फडकवल्याचे चित्र आहे. तीन पैकी 2 ग्रामपंचायतवर शिंदे गट विजयी झाला आहे. नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत.
  •  पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा फडकला. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाल्याचे दिसून येत आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या.
Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.