Instagram : इन्स्टाग्रामप्रेमींसाठी मोठी बातमी! हे छोटसं काम न केल्यास तुमचा इन्स्टा होईल बंद

| Updated on: May 05, 2022 | 12:45 PM

इन्स्टाग्रामचं एक धोरण आहे. त्या धोरणानुसार तेरा वर्षांखालील युजर्सला इन्स्टाग्राम अकाऊंट उघडण्यास मज्जाव आहे.

Instagram : इन्स्टाग्रामप्रेमींसाठी मोठी बातमी! हे छोटसं काम न केल्यास तुमचा इन्स्टा होईल बंद
इन्स्टाग्राम
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : आपल्यातले अनेकजण इन्स्टाग्रामशिवाय (Instagram) एकही मिनिट राहू शकत नाही. इंटरनेट डेटा संपला की लगेच त्यांना कधी डेटा पॅक मारू आणि कधी इंटनेट सुरू करू, असं होऊ लागतं. पण आता तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट (instagram account) बंद होऊ शकतं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इन्स्टाग्रामनं घोषित केलंय की, इन्स्टाग्राम वापरणाऱ्या युजर्सने (users) आपली जन्म तारीख बरोबर आहे का, याची खात्री करावी. बरोबर नसल्यास योग्य ती तारीख टाकून घ्यावी. मात्र, ज्या युजर्नने तसं केलं नाही त्यांना कदाचीत इन्स्टाग्राम अ‍ॅप वारणं कठीण जाऊ शकतं. त्यांचं किंबहुना इन्टाग्राम पूर्णपणे बंदही होऊ शकतं. त्यामुळे अनेक इन्स्टाग्राम युजर्स सध्या निराश आहेत. नेमकं काय प्रकरण आहे. जाणून घेऊया

काय आहे इन्स्टाग्रामचं धोरण?

इन्स्टाग्रामचं एक धोरण आहे. त्या धोरणानुसार तेरा वर्षांखालील युजर्सला इन्स्टाग्राम अकाऊंट उघडण्यास मज्जाव आहे. या नियमाचं पालन करण्यासाठी युजर्सला आपली जन्मतारीख बरोबर टाकावी लागणार आहे. ही अट डिसेंबर 2019 मध्ये लागू करण्यात आली होती. केवळ नवीन युजर्सला त्यांच्या जन्म तारखा बरोबर करण्याचं सांगण्यात आलं होतं. तर ज्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हे व्यावसायिक आहे त्यांनी देखील त्यांच्या जन्म तारखेची माहिती देणं गरजेचं आहे. इन्स्टाग्राम एफएक्यूमध्ये स्पष्ट केलं की युजर्सला त्यांच्या जन्म तारखेची माहिती द्यावीच लागणार आहे.

इन्स्टाचे टार्गेट युजर्स

यामुळे प्लॅटफॉर्मला फायदा होतो. कारण, ते युजर्सला अधिक वैयक्तिक गोष्टी दाखवू शकतात. युजर्सचे वय वापरून जाहिराती देखील दाखवली जाते. मात्र, याच ठिकाणी काही लहान मुलांनी त्यांची खोटी जन्म तारीख टाकलेली असल्यास त्यांना धोका होऊ शकतो. यामुळे इन्स्टाग्रामने जन्म तारीख योग्य टाकण्याची सूचना केली आहे.

हे सुद्धा वाचा

…तर इन्स्टा अकाऊंट बंद

इन्स्टाग्राम चुकीच्या जन्मतारखेची माहिती देणाऱ्यांवर करडी नजर ठेवत आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम वापरणाऱ्या युजर्सने आपली जन्म तारीख बरोबर आहे का, याची खात्री करावी. बरोबर नसल्यास योग्य ती तारीख टाकून घ्यावी. मात्र, ज्या युजर्नने तसं केलं नाही त्यांना कदाचीत इन्स्टाग्राम अ‍ॅप वारणं कठीण जाऊ शकतं. त्यांचं किंबहुना इन्टाग्राम पूर्णपणे बंद होऊ शकतं.