गुजरातमध्ये COVID रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

गुजरातमध्ये एका कोव्हिड रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Gujarat fire broke out at COVID Hospital)

गुजरातमध्ये COVID रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 8:22 AM

गांधीनगर : गुजरातमध्ये एका कोव्हिड रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील उदय शिवानंद असे या रुग्णालयाचे नाव आहे. ही आग सर्वप्रथम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) लागली. हे कोव्हिड रुग्णालय असल्याने आयसीयूत एकूण 11 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या आगीत काही रुग्ण हे जखमी झाले आहेत. (Gujarat fire broke out at COVID Hospital)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील उदय शिवानंद रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यात जवळपास 33 रुग्ण उपचार घेत होते. मात्र गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयातील आयसीयू विभागात आग लागली. त्यावेळी आयसीयूत 11 रुग्णांवर उपचार सुरु होते.

आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अग्निशमन दलाला काही तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र दुर्देवाने या आगीत 6 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या आगीत होरपळल्याने काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान रुग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा तोडत बाहेर काढले.

रुग्णालयाला लागलेली ही आग नेमकं कोणत्या कारणाने लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अद्याप याची कोणताही माहिती समोर आलेली नाही.  दरम्यान गुजरातमध्ये रुग्णालयाला आग लागल्या घटना वाढत असल्याचे समोर येत आहे. नुकतंच शिवानंद रुग्णालयाला लागलेली आगीची ही ऑगस्ट महिन्यातील चौथी घटना आहे.  (Gujarat fire broke out at COVID Hospital)

संबंधित बातम्या : 

farmers agitation ! शेतकऱ्यांचा आसूड कडाडला! बॅरिकेटिंग फेकल्या, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; हरियाणा बॉर्डरवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री

Corona | दिल्लीत कोरोना संसर्ग 8.49 टक्क्यांवर, 5 दिवसांमध्ये पहिल्यांदाच मृतांचा आकडा 100 च्या खाली

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.