गुजरातमध्ये मंत्र्याच्या मुलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, महिला पोलिसासोबत वाद, तिघांना अटक
गुजरातमध्ये आरोग्य मंत्री किशोर कानाणी यांचा मुलगा प्रकाश कानाणीसह तिघांना पोलिसांनी काल (12 जुलै) अटक (Gujrat Minister Kishor Kanani) केली.
अहमदाबाद : गुजरातमध्ये आरोग्य मंत्री किशोर कानाणी यांचा मुलगा प्रकाश कानाणीसह तिघांना पोलिसांनी काल (12 जुलै) अटक (Gujrat Minister Kishor Kanani) केली. अटक केल्यानंतर काहीवेळाने जामीनावर या तिघांना सोडण्यात आले आहे. गुजरातमधील सुरतमध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदीचे उल्लंघन आणि महिला पोलिसासोबत वाद केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुनीता यादव असं मिहला पोलीसाचे नाव (Gujrat Minister Kishor Kanani) आहे.
या प्रकरणात प्रकाशसह इतर सहजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर महिला पोलिसाची बदली करण्यात आली आहे. अशी चर्चा आहे. पण यावर एसीपी सीके पटेल यांनी म्हटले की, “महिला पोलीस काही दिवसांच्या सुट्टीवर गेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. ही घटना 8 जुलै रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“रात्री संचारबंदीच्या दरम्यान आरोग्य मंत्र्यांचा मुलगा प्रकाशसह इतर मित्र विनामास्क फिरत होते. महिला पोलीस सुनीता यादवने त्यांना थांबवले. त्यामुळे प्रकाशने आपले वडील किशोर कानाणी यांना कॉल लाऊन महिला पोलिसाला बोलण्यास दिले. पण यानंतरही सुनीताने ऐकले नाही. आरोपींनी महिला पोलिसाचा अपमान करण्याचाही प्रयत्न केला. याचा ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे”, असं पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी महिला पोलीसाची बदली केली होती.
And this lady constable has resigned after being let down by the same police force. https://t.co/LMDeZICGd0 https://t.co/QF7UsLEmu7
— Snehesh Alex Philip (@sneheshphilip) July 12, 2020
दरम्यान, कोरोनाच्या संकटात गुजरातमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू घोषित केला आहे. यादरम्यान जर कुणी संचारबंदीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
मंत्री किशोर कानाणींकडून मुलाचा बचाव
“माझ्या मुलाच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले आहे. पुढील येणाऱ्या स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकाश माझा मुलगा आहे त्यामुळे तो आमदार लिहिलेल्या गाडीचा वापर करु शकतो”, असं किशोर कानाणी यांनी सांगितले.
प्रकाशने महिला पोलीसाने शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. महिला पोलिसाने अयोग्य भाषेचा वापर केला तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
महिला पोलिसाच्या समर्थनासाठी जनतेचा पाठिंबा
माजी डीजीपी डीजी बंजारा, राकांपा प्रवक्ता रेश्मा पटेलसह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर महिला पोलीस सुनीता यादवच्या समर्थनास सुरु असलेल्या उपक्रमास पाठिंबा दिला. त्यासोबत सुरत आणि इतर शहरातील लोकांनी ‘वी सपोर्ट सुनीता यादव’ अशा आशयाचे बॅनर रस्त्यावर लावले आहेत.
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कोरोनाची दुसरी लाट?
कोरोनामुक्त झालेल्या लातूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, गुजरातहून लिफ्ट घेत आलेल्या महिलेला कोरोना