अखेर गुप्तेश्वर पांडे-नितीश कुमारांची भेट, पक्षप्रवेश कधी? पांडे म्हणतात…

पक्षप्रवेशासाठी नाही तर नितीश कुमार यांना धन्यवाद देण्यासाठी आलोय, अशी प्रतिक्रिया माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी दिली. (Gupteshwar Pandey Meet Bihar Cm Nitish Kumar)

अखेर गुप्तेश्वर पांडे-नितीश कुमारांची भेट, पक्षप्रवेश कधी? पांडे म्हणतात...
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 5:07 PM

पाटणा : बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. (Gupteshwar Pandey Meet Bihar Cm Nitish Kumar) जेडीयू कार्यालयात जाऊन त्यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली. ‘पक्षप्रवेशासाठी नाही तर नितीश कुमार यांना धन्यवाद देण्यासाठी आलोय’, अशी प्रतिक्रिया पांडे यांनी भेटीनंतर दिली.

गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सातत्याने चर्चा होत आहे. आज ते जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पक्षप्रवेशाच्या चर्चा फेटाळत त्यांनी भेटीचा तपशील माध्यमांना सांगितला. “मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद दिले. बिहारच्या डीजीपी पदावर असताना त्यांनी मला काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे त्यांना धन्यवाद देणं माझं काम आहे”, असं ते म्हणाले.

जेडीयूमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांवर पांडे म्हणाले, “मी आतापर्यंत तरी निवडणूक लढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी योग्य वेळी माझी भूमिका जाहीर करेन”, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं पत्रकारांनी असता “माझं फायनल झालं की तुम्हाला सांगतो”, असं म्हणत त्यांनी काही प्रश्न अनुत्तरित ठेवले.

नितीश कुमार यांच्या भेटीबाबत पत्रकारांनी पांडे यांना सविस्तर विचारलं असता, “मी आता कोणत्याही शासकीय पदावर नाही. मी आता स्वतंत्र नागरिक आहे. मी कुणालाही भेटू शकतो”, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

जेडीयू प्रवेशाच्या चर्चा

गुप्तेश्वर पांडे आज बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सकाळपासूनच रंगल्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी निवडणूक लढवण्याचा अजून विचार केलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांचा प्रवेश नक्की झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बिहार विधानसभेच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस (व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस) घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती.गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.

बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरु शकतात, अशीा शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Gupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, राजकीय पक्ष ठरला!

Gupteshwar Pandey | बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.