Gupteshwar Pandey | बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट अर्थात स्वेच्छानिवृत्ती घेतली.

Gupteshwar Pandey | बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 11:24 AM

पाटणा : बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस (व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस) घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली आहे. (Gupteshwar Pandey takes VRS from Bihar Police as Director General of Police DGP)

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी संध्याकाळी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या पांडे यांचा काल (22 सप्टेंबर) सेवेतील शेवटचा दिवसही झाला. बिहारच्या राज्यपालांनी पांडेंच्या व्हीआरएसला रात्री उशिरा मान्यता दिली. त्यानंतर गृह विभागाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली.

गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. पुढील महिन्यात बिहार निवडणुका होण्याची चिन्हं असल्याने पांडे रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडूनच ते निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत.

गुप्तेश्वर पांडे यांची कारकीर्द

गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गेरुबंध गावात झाला. पांडे यांनी पाटणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवी संपादन केली. विशेष म्हणजे संस्कृतमधून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. दुसर्‍या प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास होऊन त्यांनी पोलिस सेवेत प्रवेश केला.

गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते.

“मी आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात सामील झालेलो नाही. आणि त्यावर अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सामाजिक कार्याचा प्रश्न असेल, तर ते मी राजकारणात प्रवेश न करताही करु शकतो, अशी प्रतिक्रिया गुप्तेश्वर पांडे यांनी दिली. (Gupteshwar Pandey takes VRS from Bihar Police as Director General of Police DGP)

सुशांतसिह राजपूत प्रकरणी चर्चेत

“महाराष्ट्र पोलिसांना इतकाच अभिमान असेल. तर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी 50 दिवसांत काय केलं? काय चौकशी केली, हे सांगावं. महाराष्ट्राचे गृहसचिव फोन उचलत नाहीत, बिहार पोलिसांचे फोनही घेत नाहीत. पूर्ण संवाद मुंबई पोलिसांनी थांबवला आहे” असा आरोप पांडे यांनी ऑगस्ट महिन्यात केला होता.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता. सुशांतसिह राजपूत प्रकरणात गुप्तेश्वर पांडे जातीने लक्ष घालताना दिसत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोलण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची लायकी नाही, असं ते म्हणाले होते. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर पांडेंनी प्रतिक्रिया दिली होती.

संबंधित बातम्या :

नितीशकुमारांवर बोलण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही, बिहार पोलीस महासंचालकांची आगपाखड

“मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल

(Gupteshwar Pandey takes VRS from Bihar Police as Director General of Police DGP)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.