34 वर्षांपासून शासनाच्या अनुदानाशिवाय बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ज्ञानार्जनाचं काम

सोनदरा येथील गुरुकुलम शाळेत यंदा 34 वा पालक मेळाव पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनेक कला कुसुरीसह स्वतःच्या बौद्धिक चाचण्या पालकांसमोर सादर केल्या.

34 वर्षांपासून शासनाच्या अनुदानाशिवाय बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ज्ञानार्जनाचं काम
Follow us
| Updated on: Feb 09, 2020 | 12:08 AM

बीड : मराठवाड्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातातील कोयता गळून पडावा, मुले उच्चशिक्षित व्हावे, हाच उद्देश घेऊन सुदाम भोंडवे या अवलियाने बीडमधील सोनदरा येथे गुरुकुलम शाळेची स्थापना केली (Gurukulam School in Sondara Beed). या शाळेत यंदा 34 वा पालक मेळाव पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनेक कला कुसुरीसह स्वतःच्या बौद्धिक चाचण्या पालकांसमोर सादर केल्या. यावेळी आपल्या पाल्यांचा शैक्षणिक विकास पाहून अनेक पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसला.

गुरुकुलम या निवासी शाळेत आलेला विद्यार्थी दिवाळी वगळता कधीही सुट्टीवर जात नाही. त्यांच्या संपूर्ण विकासासाठी गुरुकुलमकडून वर्षभर वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. याचाच भाग दरवर्षी येथे विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा घेतला जातो. यात पालकांना आपल्या मुलाची बौद्धिक चाचणी पाहण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली जाते. यावेळ विद्यार्थी पालकांसमोरच शिक्षक होतात आणि आपल्या विविध पैलूंची मांडणी करतात. इथल्या प्रत्येक मुलांना अधिकारी व्हायचंय असा निश्चय ते बोलून दाखवतात. विशेष म्हणजे या शाळेत ‘वोपा’ (VOPA) या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही राबवला जात आहे.

केवळ 3 खोल्यांपासून सुरू झालेला या शाळेचा प्रवास आज भव्य अशा इमारतीपर्यंत येऊन पोहचला आहे. गुरुकुलमला 34 वर्ष पूर्ण झाली असून आजपर्यंत 2 हजार 700 कामगारांची मुले उच्चशिक्षित होऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शासनाचे कसलेच अनुदान न घेता शिक्षणक्षेत्रात गुरुकुलमने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.

बीडपासून 27 किलोमीटर अंतरावर सोनदरा गावात एका डोंगर कुशीत गुरुकुलमचं काम सुरू आहे. या गुरुकुलममधून आतापर्यंत 2700 विद्यार्थी बाहेर पडलेत. यापैकी हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात नोकऱ्या देखील करत आहेत. ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. हाच उद्देश या गुरुकुलमने ठेवलाय. ऊसतोड मजुरांची मुले देखील अधिकारी झाली पाहिजेत. त्यांच्या हातातला कोयता गळून पडला पाहिजे. हा उद्देश उराशी बाळगत सुदाम भोंडवे गेल्या 34 वर्षांपासून अविरत काम करत आहेत.

34 वर्षांपूर्वी शेताच्या झोपड्यात गुरुकुलम सुरू करण्यात आलं. आता कुठे गुरुकुलम भव्य अशा इमारतीत आलं. सुदाम भोंडवे यांनी स्वतःच्या मालकीची सर्वच्या सर्व 16 एकर जमीन याच गुरुकुलमसाठी वापरली. याच जमिनीवर आज हे शिक्षणाचं केंद्र थाटण्यात आलंय. यातील 6 एकर जमिनीवर भाजीपाल्याची शेती करण्यात येते. हाच भाजीपाला इथल्या विद्यार्थ्यांच्या भूकेसह पोषणतत्वांच्या गरजा पूर्ण करतो. शासनाची कसलीही मदत न घेता निव्वळ समाजाच्या देणगीवरच हे गुरुकुलम सुरु आहे.

ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्याला लागलेला ऊसतोड मजुरीचा कलंक पुसण्यात अद्यापही अपयशच आहे. निरक्षरतेत सर्वात जास्त झोकून दिलेला जिल्हा म्हणून देखील बीडची ओळख आहे. हीच ओळख पुसण्याचं काम काही शैक्षणिक संस्थांकडून सुरू झालं. त्यापैकीच एक महत्त्वाची शिक्षण संस्था म्हणजे सोनदरा गुरुकुलम. गुरुकुलचं कार्य पाहून बीडसह राज्यातील अनेक सामाजिक व्यक्ती आणि संघटना वेळोवेळी मदतीला धावून येतात. अनेकजण स्वतःच्या कामाच्या फावल्या वेळात गुरुकुलमची मदत करतात, अशी माहिती डॉ. प्रदिप उजेगर यांनी दिली.

या संस्थेतील मुलांचा बौद्धिक विकास पाहून त्यांचे पालक देखील मोठे आनंदात असतात. मजुरी करुनही आयुष्यातील मुलभूत गरजा पूर्ण होत नाही. अशा स्थितीत हे पालकही आपला मुलगा मजूर होऊ नये, तो अधिकारी व्हावा, असं स्वप्न पाहतात. पालकांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुरुकुलम मदत करत असल्याची भावना अनेक पालक व्यक्त करतात. याचा आनंद अनेक पालकांच्या चेहऱ्यावरही दिसून येतो.

जिल्ह्यात अनेक शिक्षण संस्था आहेत ज्यांना सरकारी अनुदान आहे. मात्र सरकारचे कसलेच अनुदान नसतांनाही केवळ मजुरांची मुले शिकून अधिकारी झाले पाहिजे, असा वसा घेणारी ही जिल्ह्यातील एकमेव गुरुकुलम संस्था आहे. त्यांच्या याच वेगळेपणामुळे ही शाळा जिल्ह्यात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.

Gurukulam School in Sondara Beed

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.