फेब्रुवारीपर्यंत अर्ध्या देशाला कोरोना संसर्ग, नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख रुग्ण, सरकारी समितीतील सदस्याचे भाकित

फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील अर्ध्या लोकांना कोरोनाचा संसर्ग (corona patient in India ) झाला असेल. तसेच, नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख नवे कोरोना रुग्ण आढळू शकतात. (corona patient in India )

फेब्रुवारीपर्यंत अर्ध्या देशाला कोरोना संसर्ग, नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख रुग्ण, सरकारी समितीतील सदस्याचे भाकित
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 9:08 AM

दिल्ली : फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील अर्ध्या लोकांना कोरोनाचा संसर्ग (corona patient in India ) झालेला असेल. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. तसेच, नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख नवे कोरोना रुग्ण आढळू शकतात. कोरोना संसर्गावर अभ्यास करणाऱ्या समितीचे सदस्य प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी तसे भाकित केले आहे. ते आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक आहेत. (half country will suffer from corona upto february said government committee member)

मनिंदर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 30 टक्के जनतेला कोरोचा संसर्ग झाला आहे. तसेच येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात देशातील 50 टक्के जनतेला कोरोना झालेला असेल. त्यानंतर पन्नास टक्के जनतेला लागण झाल्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 75 लाखांवर गेली आहे. त्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहेत. आकडेवारीचा विचार केल्यास फक्त अमेरिकेत भारतापेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आहेत.

सिरोलॉजिकल सर्वेवर विश्वास नाही

मनिंदर अग्रवाल यांनी सिरोलॉजिकल सर्वेवर विश्वास नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, सिरोलॉजिकल सर्वेनुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत देशात फक्त 14 टक्के जनतेला कोरोनाची लागण झाली होती. पण सिरोलॉजिकल सर्वे करताना जे नमुने घेतले जातात, त्यावरुन ही आकडेवारी खरी असेल असे म्हणणे जिकरीचे होईल. तसेच सॅम्पलिंग चुकीच्या पद्धतीने घेतले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग मोजण्यासाठी प्रोफेसर अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी पद्धत विकसित केली आहे. ज्यामध्ये समोर न येणाऱ्या किंवा सरकारच्या दफ्तरी नोंद न झालेल्या कोरोना रुग्णांचीसुद्धा मोजणी होईल. ज्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची खरी आकडेवारी समोर येणास मदत होईल.

नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख कोरोनाग्रस्त

प्रोफेसर मनिंदर अग्रवाल यांनी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितलंय, कोरोनाला थोपवायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे हे नियम पाळावेच लागतील. अन्यथा कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. तसेच कोरोनाला गांर्भियाने घेतलं नाही तर आगामी काळात महिन्याला 26 लाख कोरोनाग्रस्त आढळतील. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

बरे झालेल्या कोरोना रुग्णांना अनेक महिन्यांपर्यंत आजाराच्या लक्षणांचा त्रास : ऑक्सफर्ड

भारतात फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल; केंद्रीय समितीचे भाकीत

कोरोनाबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं, केंद्र सरकारच्या समितीची माहिती

(half country will suffer from corona upto february said government committee member)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.