दोन्ही हात नाहीत, पायाने पेपर लिहिले, गुण मिळाले…..
उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने पायाने परीक्षेत पेपर लिहिला (Writing with leg) आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने पायाने परीक्षेत पेपर लिहिला (Writing with leg) आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत त्याला 59 टक्के मिळाले आहे. अमर बहादुर असं या दिव्यांग मुलाचे नाव आहे. अमरच्या या कामगिरीमुळे संपूर्ण अमेठी जिल्ह्यात त्याचे कौतुक होत आहे. अमरला लहानपणापासून दोन्ही हात नाहीत. हात नसले तरीही त्याने पायने पेपर लिहित सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेठी जिल्ह्यात सध्या अमरच्या नावाची जोरदार चर्चा (Writing with leg) सुरु आहे.
अमर बहादुरने आपल्या जिद्दीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अमर हा खूप जिद्दी आहे, असे त्याच्या आईने सांगितले. याच जिद्दीच्या जोरावर त्याने शाळेतील परीक्षा पायाने लिहून त्यात यश मिळवलं आहे.
अमरने सर्व पेपर आपल्या पायाने लिहिले आहेत. तसेच त्याला या परीक्षेत 59 टक्के मिळाले. त्याची टक्केवारी पाहून सर्वांना धक्का बसला आहे.
“लहानपणापासून त्याचे हात व्यवस्थित नाहीत. पहिले आम्ही त्याला जेवण भरवत होतो. पण आता तो स्वत: च्या पायाने जेवतो. त्याला शिकण्याची खूप आवड आहे. पण पैशामुळे आम्ही चांगल्या शाळेत त्याचे शिक्षण करु शकत नाहीत. पण जर सरकारकडून मदत झाली तर बर होईल. नोकरी मिळाली तर हा पुढे जाऊन शिकू शकेल. लहानपणापासून तो विभागातील मुलांना शिकवतो”, असं दिव्यांग अमरची आई केवला देवीने सांगितले.
“परीक्षेच्या निकालाने माझा विश्वास वाढला आहे. मी आणखी मेहनत करणार आणि शिक्षक बनणार. तसेच देशाचे आणि समाजाचे नाव रोषन करणार. सरकारने मदत केली तर पुढे पण शिकणार”, असं दिव्यांग अमरने सांगितले.
दरम्यान, अमर हा मोबाईल मॅकेनिकसुद्धा आहे. पायाने मोबाईल उघडतो आणि तो तयार करतो. हे काम त्याच्यासाठी कठीण नाही. यामधून जे काही पैसे मिळतात ते तो शिक्षणासाठी वापरतो.