Happy Diwali 2020 | बॉलिवूडचे ‘सेलिब्रेशन’, अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांजसह अनेक कलाकारांकडून दिवाळीच्या शुभेच्छा!

आपल्या चाहत्यांच्या सुख समृद्धी, आणि शांतीची मनोकामना करणारे ट्विट्स कलाकारांनी केले आहेत.

Happy Diwali 2020 | बॉलिवूडचे ‘सेलिब्रेशन’, अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांजसह अनेक कलाकारांकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
| Updated on: Nov 14, 2020 | 12:59 PM

मुंबई : दिव्यांच्या या आनंदोत्सवात सगळीकडेच उत्साहाचा माहौल आहे. देशभरात सगळेच एकमेकांना दिवाळीच्या (Diwali 2020) शुभेच्छा देत आहेत. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनीदेखील (Bollywood Celebrities) आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या आहेत. आपल्या चाहत्यांच्या सुख समृद्धी, आणि शांतीची मनोकामना करणारे ट्विट्स कलाकारांनी केले आहेत. दिवाळी निमित्ताने अनेक सोहळे रद्द झाले असले तरी, बॉलिवूडकरांच्या या शुभेच्छांनी चाहते सुखावले आहेत (Happy Diwali Wishes from Bollywood Celebrities).

कलाकारांच्या शुभेच्छा

महानायक अमिताभ बच्चन दरवर्षी मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. अमिताभ सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय कलाकारांपैकी एक आहेत. यंदाच्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी विक्रमी 5.51 लाख दिव्यांनी प्रकाशित झालेल्या अयोध्या नगरीचा फोटो शेअर केला आहे. विद्युत रोषणाईने नटलेल्या अयोध्या नगरीचा फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

‘सुरज पे मंगल भारी’ फेम अभिनेता दिलजीत दोसांझने देखील चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भांगडा करतानाचा व्हिडीओ दिलजीतने ट्विटरवर पोस्ट केला आहे (Happy Diwali Wishes from Bollywood Celebrities).

अभिनेत्री निमरत कौरने देखील आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत एक छान पोस्ट लिहिली आहे. “यावर्षी दिवाळी खासकरुन कुटुंबासमवेत साजरे करणे ही खूप आनंदाची भावना आहे. या शुभ दिवसाचा प्रकाश आणि प्रेम सर्वांसाठी चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”, असे ट्विट तिने केले आहे.

अभिनेता मनोज बाजपेयीनेही आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

‘फटके न फोडता दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करूया. इतर दुसऱ्या पद्धतीने दिवाळीचा आनंद साजरा करूया. सर्वत्र रोषणाई करून झगमगाटाने देशाला प्रकाशमय करूया’, असे म्हणत कुणाल कोहलीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Happy Diwali Wishes from Bollywood Celebrities).