मराठी कायदेतज्ज्ञ हरीश साळवेंची भरारी, थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

ज्येष्ठ कायदातज्ज्ञ हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे (Harish Salve become Britain Queen's Counsel).

मराठी कायदेतज्ज्ञ हरीश साळवेंची भरारी, थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती
Follow us
| Updated on: Jan 16, 2020 | 11:10 PM

नवी दिल्ली : ज्येष्ठ कायदातज्ज्ञ हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे (Harish Salve become Britain Queen’s Counsel). ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने त्यांची कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे वकील म्हणून नेमणूक केली. साळवे आपल्या कायद्याच्या ज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जातात. कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरणात साळवे यांनीच पाकिस्तानविरोधात कुलभूषणची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात ताकदीने मांडली होती. यासाठी त्यांनी केवळ 1 रुपये मानधन घेतले होते (Harish Salve become Britain Queen’s Counse).

हरीश साळवे यांची अधिकृतपणे 16 मार्चला नियुक्ती होईल. वकिलीच्या क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखवलेल्या वकिलांनाच ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नेमणूक करत सन्मानित केलं जातं.

कोण आहेत हरीश साळवे?

बॅरिस्टर हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43 व्या क्रमांकावर आहे. हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. घरातूनच वकिलीचं बाळकडू मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. 1992 मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि 1999 मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

सलमान खानलाही वाचवलं

मुंबई सेशन्स कोर्टाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर सलमान आणि कुटुंबीयांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. सलमानला थेट तुरुंगात नेलं जाणार असल्याचीही चर्चा झाली. मात्र तेव्हाच वरिष्ठ वकील हरिश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला. हरिश साळवे खास सलमानसाठी दिल्लीतून मुंबईत आले होते.

मोठ्या खटल्यांचा अनुभव

कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली आणि त्यांचं नाव देशभरात गाजलं. केंद्र सरकारसोबतच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली होती. इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली. सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली होती.

संबंधित बातम्या:

देशातले सर्वात महागडे वकील हरिश साळवे कोण आहेत?

कुलभूषण जाधव खटला: पाकिस्तानच्या 20 कोटींविरोधात भारताचा 1 रुपया जिंकला

अजून 1 रुपया मिळाला नाही, दिल्लीत जाऊन घेणार : हरिश साळवे

रात्री 8.50 वा. फोन झाला, सुषमा स्वराज यांनी उद्या 1 रुपये फी घेण्यासाठी बोलावलं होतं, हरीश साळवेंना धक्का

सुषमा स्वराज यांचा शब्द मुलीने पाळला, हरीश साळवेंना एक रुपया दिला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.