औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. नुकतंच या आंदोलनाला रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यामुळे प्रहाराचं आंदोलन असतानाही सासऱ्याविरोधात जावई टाकीवर पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. (Harshvardhan Jadhav Visit Prahar Aandolan)
कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले होते. या वादग्रस्त वक्त्याच्या विरोधात प्रहार संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला. यानंतर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (10 डिसेंबर) औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
गेल्या 24 तासापासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीविरोधात शिवाजीनगर पाण्याच्या टाकीला पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
या आंदोलनाची माहिती मिळताच रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी प्रहारच्या आंदोलनाला भेट दिली. हर्षवर्धन जाधव हेही पाण्याच्या टाकीवर दाखल झाले आहेत. मात्र औरंगाबाद पोलिसांनी त्यांना पाण्याच्या टाकीवर जाण्यापासून रोखल्याचेही बोललं जात आहे.
“केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. जर दुपारी 4 वाजेपर्यंत माफी मागितली नाही, तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु,” असा इशारा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
केंद्रीय कृषी कायदा हा शेतकरी हिताचा आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांच्या मर्जीप्रमाणे कुठेही विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात व्यापारी जातील आणि शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे भाव देतील असा हा केंद्रीय कृषी कायदा आहे. पण विरोधक केंद्रीय कृषी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. (Harshvardhan Jadhav Visit Prahar Aandolan)
Qutub Minar | कुतुब मिनारच्या आतल्या मशिदीत हिंदू, जैन मंदिरं? वाचा काही धक्कादायक माहितीhttps://t.co/Dukq79pQHn#qutubminar #NewDelhi #Mosque
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
संबंधित बातम्या :
बाळा बोठेला आता ‘टायमिंग’चाही धक्का ? रेखा जरे हत्या प्रकरणाला आणखी एक वळण
महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा