हरियाणा सरकारची मोठी घोषणा; ‘या’ नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा
शेती व्यवसायाला चालना आणि शेतकऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Haryana government horticulture farming)
चंदीगड : शेती व्यवसायाला चालना आणि शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा या गोष्टी लक्षात घेऊन हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथील शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारने ‘मुख्यमंत्री बागबानी फसल बीमा योजना‘ (CM Fasal Bima Yojana) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना विमाकवच देण्यात येईल. या योजनेचा फायदा बागायती शेतकऱ्यांना होणार आहे. (Haryana government announced new scheme of insurance for horticulture farming)
योजनेचं स्वरुप काय ?
हरियाणा सरकारने लागू केलेल्या या नव्या योजनेनुसार बागायती पिकांना विमाकवच मिळणार आहे. पिकाचे काही नुकसान झाल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान फसल बीमा योजनेच्या (PM Fasal Bima Yojana) धर्तीवर बागायती पिकांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत 14 भाज्या, चार फळपीक आणि दोन मसाले उत्पादनांच्या नुकसानीवर भरपाई मिळेल. या योजनेनुसार शेतकऱ्यांना विम्याच्या एकूण रकमेपैकी 2.5 टक्के रक्कम भरावी लागेल. उरलेली रक्कम राज्य सरकारकडून दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांचा काय फायदा ?
हरियाणा सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकाच्या सुरक्षेची हमी मिळेल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. शेतात लावलेल्या भाजांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 30 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच, नैसर्गिक संकटामुळे (Natural Disaster) पिकाचे नुकसान झाल्यास पात्र शेतकऱ्यांना 40 हजार रुपये प्रति एकर या प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल.
कोणकोणत्या पिकांना विमाकवच
मुख्यमंत्री बागायती शेती विमा योजनेमध्ये अनेक पिकांचा समावेश आहे. टोमॅटो, कांदा, बटाटा, फुलगोबी, वटाणा, भेंडी, कारली, वांगी, मिर्ची, शिमला मिर्ची, हळद, लसण, आंबे, बोर या पिकांच्या लगवडीनंतर शेतकरी या पिकांचा विमा उतरवू शकतात. त्यानंतर फळपिकांचे नुकसान झाल्यास मुख्यमंत्री बागबानी फसल बीमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
दरम्यान, हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या या नव्या योजनेमुळे बागायती शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय शेतकरी प्रोग्रेसिव्ह असोसिएशन संघटनेचे शेतकरी तसेच पदाधीकारी यांनी मनहोरलाल सरकारच्या या निर्णयाचे स्वगत केले आहे.
Vastu Tips | घरात चुकूनही लावू नका ‘ही’ रोपं, अन्यथा होऊ शकते नुकसान!#VastuTips | #HomeDecor | #HealthWealthhttps://t.co/31CkAKhtal
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021
संबंधित बातम्या :
कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?
नवीन वर्षात एक लाख जिंका, मोदी सरकारकडून खास संधी
(Haryana government announced new scheme of insurance for horticulture farming)