घाईत आला, घाईतच गेला, शहीद मेजर बिष्ट यांच्या वडिलांचा टाहो

देहरादून : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत. शनिवारी एलओसीवर राजौरी जिल्ह्यातील नौसेरा सेक्टरमध्ये आयईडी डिफ्यूज करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले. 31 वर्षीय चित्रेश यांचा पुढच्या महिन्यात 7 तारखेला विवाह होता. उत्तराखंडमधील पोलीस निरीक्षकाचे ते चिरंजीव आहेत. देहरादूनमधील त्यांच्या मूळ गावी मेजर चित्रेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. […]

घाईत आला, घाईतच गेला, शहीद मेजर बिष्ट यांच्या वडिलांचा टाहो
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

देहरादून : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत. शनिवारी एलओसीवर राजौरी जिल्ह्यातील नौसेरा सेक्टरमध्ये आयईडी डिफ्यूज करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले. 31 वर्षीय चित्रेश यांचा पुढच्या महिन्यात 7 तारखेला विवाह होता. उत्तराखंडमधील पोलीस निरीक्षकाचे ते चिरंजीव आहेत. देहरादूनमधील त्यांच्या मूळ गावी मेजर चित्रेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वात मन हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे मेजर चित्रेश हे 28 फेब्रुवारीपासून लग्नाच्या सुट्टीवर येणार होते. मुलाच्या अंत्यविधीनंतर प्रतिक्रिया देताना वडिलांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. ज्या मुलाला हाता-खांद्यावर खेळवलं, त्याला अखेरचा निरोप देताना या बापाची स्थिती अत्यंत वाईट आहे. मेजर चित्रेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

नेहमी घाईतच यायचा.. घाईतच गेला.. अशी प्रतिक्रिया देताना मेजर चित्रेश यांच्या वडिलांचे अश्रू थांबत नाहीत. लहानपणापासून ते अखेरपर्यंतच्या गोष्टी आठवत ते रडत आहेत. रडताना ते म्हणाले, “सोनू, तू नेहमी घाईतच असायचा.. सातव्या महिन्यात जन्म झाला.. दहाव्या महिन्यात चालायला लागलास.. सर्व मित्रांपेक्षा लवकर आर्मीत अधिकारी झालास.. आणि आता लवकरच गेलासही.. हे शब्द कानावर पडताना प्रत्येकाचं मन सुन्न झालं होतं.

मेजर चित्रेश यांच्यासोबत प्रशिक्षण घेणारी त्यांचे मित्रही अनेक आठवणी सांगतात. मेजर चित्रेश हे कधीही कोणत्याच गोष्टीला घाबरायचे नाही. नव्या आव्हानासाठी नेहमी तयार असायचे आणि त्याच्या उत्साहाचं नेहमी कौतुक केलं जायंच, असं मित्र सांगतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.