Food | हिवाळ्यात साखरेऐवजी गुळाचे अधिक सेवन आरोग्यासाठी अतिशय लाभदायक!

साखरेऐवजी गुळाचा वापर रोग प्रतिकारशक्ती वाढवतो आणि खोकला आणि सर्दीपासून आपला बचाव करतो.

Food | हिवाळ्यात साखरेऐवजी गुळाचे अधिक सेवन आरोग्यासाठी अतिशय लाभदायक!
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 4:58 PM

मुंबई : गुळ गरम पदार्थ असल्याने हिवाळ्यात गुळाचा वापर सर्वाधिक केला जातो. साखरेऐवजी गुळाचा वापर रोग प्रतिकारशक्ती वाढवतो आणि खोकला आणि सर्दीपासून आपला बचाव करतो. गुळ हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेच,परंतु गुळाचे नियमित सेवन त्वचा तुकतुकीत करते आणि इतर अनेक त्रासांपासून आपल्याला दूर ठेवते.(Health Benefits of jaggery)

गुळाचे गुणधर्म

गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरेऐवजी गुळ घालून प्यावे, हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते.

गूळ खाण्याचे फायदे

अ‍ॅसिडिटीपासून मुक्तता

आपल्याला जर वारंवार गॅस किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या होत असेल तर, गुळाच्या सेवनाने फायदा होईल. त्याच वेळी, गूळ, मीठ आणि काळे मीठ एकत्र मिसळून खाल्ल्यास करपट ढेकारांपासून मुक्तता मिळेल.(Health Benefits of jaggery)

रक्ताची कमतरता भरून निघते

गुळ हा लोहाचा उत्तम स्रोत असल्याने शारीरिक अशक्तपणा कमी होतो. जर, शरीरात हिमोग्लोबिनची कमी असेल तर, दररोज गुळ खाल्ल्यास त्वरित फायदा होईल. गूळ खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढते.

रक्तदाबावर नियंत्रण

रक्तदाब नियंत्रित करण्यात गुळाची भूमिका महत्त्वाची ठरते. विशेषत: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दररोज गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

हाडांची मजबूती

गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करण्यास खूप उपयुक्त आहेत. गुळाबरोबर आले खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. (Health Benefits of jaggery)

बळकट शरीर

गुळ शरीर मजबूत आणि सक्रिय ठेवतो. शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी दुधाबरोबर गुळाचे सेवन केल्याने सामर्थ्य वाढते आणि शरीर ऊर्जावान राहते. जर, आपल्याला दूध आवडत नसेल तर, एक कप पाण्यात पाच ग्रॅम गुळ, थोडा लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळून खाऊ शकता.

सर्दी-पडश्यापासून बचाव

सर्दीपासून बचाव करण्यासाठी गुळ प्रभावी ठरतो. काळी मिरी आणि आल्याबरोबर गुळ खाल्ल्यास सर्दीमध्ये आराम मिळतो. वारंवार खोकला येत असल्यास साखरेऐवजी गुळाचा खडा तोंडात ठेवावा. आल्याबरोबर गुळ खाल्ल्याने घसा खवखवणे आणि जळजळ होण्यापासून आराम मिळतो.

(Health Benefits of jaggery)

(टीप : उपचारांपूर्वी अथवा अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.