Health | दातदुखी, सांधेदुखीसह अनेक शारीरिक समस्यांवर गुणकारी ‘मोहरीचे तेल’!

मोहरी आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते. मोहरी आणि मोहरीचे तेल अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते.

Health | दातदुखी, सांधेदुखीसह अनेक शारीरिक समस्यांवर गुणकारी ‘मोहरीचे तेल’!
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 6:57 PM

मुंबई : आपल्या स्वयंपाक घरात अनादी काळापासून मोहरीच्या तेलाचा (Mustard Oil) उपयोग होत आला आहे. याचे कारण म्हणजे मोहरी तेल आरोग्यासाठी लाभदायक (Health Benefits) असते. मोहरीच्या तेलाचा उपयोग हा सर्वात जास्त खाद्यपदार्थ बनविण्यासाठी करण्यात येतो हे आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे. पण मोहरीचे तेल हे केवळ याच कामासाठी मर्यादित नाही, तर याचा उपयोग तुम्ही आरोग्यासाठी करून घेऊ शकता. हिंदीमध्ये याला सरसों का तेल म्हटले जाते तर मराठीत आपण मोहरीचे तेल म्हणतो. शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो (Health benefits of mustard oil).

मोहरी आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते. मोहरी आणि मोहरीचे तेल अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. मोहरीच्या बियांचे त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत. मोहरीतील बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करते.

मोहरीच्या दाण्यात्तून मोहरीचे तेल काढण्यात येते. याचे वैज्ञानिक नाव ब्रेसिका जुनसा असे आहे. तर विविध भाषेत याला वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. इंग्रजीमध्ये मस्टर्ड, तेलुगूमध्ये अवन्यून, मल्याळममध्ये कदुगेना आणि मराठीत मोहरी असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या घरात मोहरी हा पदार्थ हमखास सापडतो आणि उत्तरेकडील लोकांच्या स्वयंपाकघरात मोहरीचे तेलही हमखास आढळते (Health benefits of mustard oil).

सांधेदुखीत लाभदायक

मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे अर्थात मांसपेशी दुखत असतील तर त्यावर अतिशय गुणकारी ठरते. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते. तसेच यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळेही सांधेदुखी आणि गाठींसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

त्वचेसाठी उपयुक्त

मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते. मोहरीच्या त्वचा ग्लोईंग करता येते. मोहरीचे तेल त्वचेस तरूण राखण्यास मदत करते. ड्राय स्किन असल्यास मोहरीच्या बीया चांगला उपाय मानला जातो. मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असल्याने चेहऱ्यावर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यासाठी लाभदायक ठरते. मोहरीच्या तेलात तसेच बियांमध्ये कॅरोटीन आणि ल्यूटिन हे घटक असल्याने अँटी-ऑक्सिडेंट तयार करतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असल्याने हे त्वचेवर अँटी-एजिंगप्रमाणे काम करते आणि त्वचेस तारूण्या प्राप्त होते.(Health benefits of mustard oil)

केसांच्या समस्यांवर गुणकारी

बरेच लोक केसांना मोहरीचे तेल लावतात. मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे फायदे अनके आहेत. केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यास मदत होते. मोहरीच्या तेलातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा-3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिडचा उपयोग केसांची वाढण्यासाठी होतो. याशिवाय यामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसातील कोंड्याची समस्या दूर करतात.

दातदुखीपासून सुटका

मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे मीठ मिसळून दातांवर दिवसातून 2 वेळा मसाज केल्यास दातदुखीपासून आराम मिळेल.

(टीप : उपचारांपूर्वी अथवा अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(Health benefits of mustard oil)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.