नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे बोलले जात आहे, अशातच भारताच्याही चिंता वाढल्या आहेत. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Health Minister Harsh Vardhan) म्हणाले की, “देशातील कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, आपलं सरकार सतर्क असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. कोव्हिड-19 (Covid-19) ला थोपवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकारने केल्या आहेत, तसेच सरकार अजूनही महत्त्वपूर्ण पावलं उचलत आहे”. (Health Minister on new Coronavirus strain in UK; says government on alert, no need to panic)
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळून आल्याची सध्या चर्चा आहे. तसेच तिथे कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा बंद करण्याबाबतच्या एका प्रश्नावर उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले की, “सध्या बाहेर चर्चा होत असलेली स्थिती काल्पनिक आहे, सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, काल्पनिक चिंता आहेत, तुम्ही सर्वांनी स्वतःला यापासून दूर ठेवायला हवं. येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी आपलं सरकार सज्ज आणि जागरुक आहे. जर तुम्ही मला विचारत असाल तर मी एवढच सांगेन की घाबरण्याची गरज नाही”.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी आणि तिथून येणारी विमानं रद्द केली आहेत. या नव्या कोरोना व्हायरसमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही आज आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा आज रात्री 12 वाजल्यापासून बंद होणार आहे. त्याआधी ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारत सरकारने तसं ट्विट करून ही माहिती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रिटनकडे जाणारी आणि ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली होती. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना फैलावत असल्याने भारतात त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा, असं आवाहन केजरीवाल आणि चव्हाण यांनी केलं होतं.
ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी
दरम्यान, कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढल्यामुळे जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. युरोपमधील बहुतांश देशांनी ब्रिटनमधून येणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच, जर्मनीसुद्धा ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. नेदरलँडने डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रिटनमधील विमानाला देशात उतरण्यास बंदी असल्याचे जाही केले आहे.
ऑस्ट्रिया, इटलीकडूनही खबरदारीचा उपाय
ऑस्ट्रिया आणि इटली या देशांकडूनही खबरदरी घेण्यात येत आहे. ब्रिटनहून येणारे विमान देशात उतरण्यावर बंदी घालण्याचा विचार या देशांकडून सुरु आहे. इटलीचे परराष्ट्रमंत्री लुइगी डी मायो यांनी आवश्यक ते उपाय करण्याची गरज व्यक्त केली आहे.
नवा कोरोना व्हायरस किती घातक?
कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा?, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी अशावी?, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी बोलताना बीबीसीचे खास आरोग्यविषयक पत्रकार जेम्स लॅलेगर यांनी अधिक माहिती दिली आहे. ‘नव्या कोरोना व्हायरसला समजून घेण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. व्हायरसमध्ये झालेला बदल हा स्वाभाविक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही व्हायरस स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना व्हयरसच्या बाबतीत झाले आहे,” असे लॅलेगर यांनी सांगितलं. (New coronavirus strain: india government ban international flights to UK)
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर कोरोना लस प्रभावी ठरेल?
2020च्या वर्षात कोरोना आला, त्यानं पाय पसरले, सगळ्या जगाला कवेत घेतलं, सगळं जग ठप्प केलं, अनेकांनी जीव गमावला, आता 2020 च्या शेवटी कोरोना लस तयार झाल्या आहेत. लवकरच या लस अनेकांना टोचल्या जातील. मात्र या लस कोरोना लस कोरोना स्ट्रेनवर प्रभावी ठरलीत? याच प्रश्नाचं उत्तर आता शास्रज्ञ शोधत आहेत. ब्रिटीश शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोना स्ट्रेनवर सध्याची कोरोना लस प्रभावी ठरेल. ही लस लोकांची प्रतिकारशक्ती वाढवणार आहे. त्यामुळं कोरोनाचा सामना ते सहजरितीने करु शकतात. मात्र, कोरोनाचे नवनवे स्ट्रेन येत राहिले तर ती डोकेदुखी ठरु शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे. (New coronavirus strain: india government ban international flights to UK)
संबंधित बातम्या:
कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा
भारतात जानेवारीमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत
(Health Minister on new Coronavirus strain in UK; says government on alert, no need to panic)