मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क : राजेश टोपे

मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Health Minister Rajesh Tope Announce to reduce mask price)

मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क : राजेश टोपे
महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीला 1 तास झाडूने रस्ता स्वच्छ करावा लागतो.
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 9:48 AM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर दुप्पट-तिप्पट भावाने विकल्या जात असल्याचं अनेकदा समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने नुकतंच राज्य सरकारला याबाबतचा अहवाल सादर केला. त्यानुसार एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण 19 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Health Minister Rajesh Tope Announce to reduce mask price)

या समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या किंमतींना शासन मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असल्यानं असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

कोरोना साथीच्या आधी एन 95 मास्क 40 रुपयांना विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास्क 40 वरून 175 रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला. म्हणजे त्यांच्या दरात 437.5 टक्के एवढी वाढ झाल्याचे निदर्शनास आले. काही एन 95 मास्कची तर 250 रुपयांपर्यंत विक्री झाली. तर तिहेरी आणि दुहेरी पदर असलेले मास्क 8 ते 10 रुपयांवरून 16 रुपयांना विकण्यात आले. त्यांच्या किंमती 160 टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.

कोरोना काळात राज्य शासनाच्या वतीने सामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे आणि सॅनिटायझरने हात धुवावेत, असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरला मोठी मागणी निर्माण झाली. त्याचे दर नियंत्रित असावेत यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.

या समितीने मास्क उत्पादक कंपन्यांचा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा यासर्व बाबींचा अभ्यास करुन समितीने किंमत निश्चित केल्या आहेत. मास्क किफायतशीर किमतीत उपलब्ध झाल्यावर सामान्यांना दिलासा मिळणार आहे. योग्य निकषानुसार त्याचे उत्पादन देखील होईल. तसेच योग्य दरात त्याचा पुरवठाही होईल. रुग्णालयांच्या रुग्णसेवा खर्च देखील त्यामुळे कमी होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.(Health Minister Rajesh Tope Announce to reduce mask price)

संबंधित बातम्या : 

पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी

‘दादा’, ‘मामा’ ते बुरी नजर वाले; फॅन्सी नंबर प्लेटवाले पुन्हा ट्रॅफिक पोलिसांच्या रडारवर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.