Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 7:53 AM

अहमदनगर : “राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे,” असेही राजेश टोपे म्हणाले. अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

“येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,” अशी अपेक्षा करूया असे राजेश टोपे म्हणाले.

“कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे,” असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.

“तसेच आरटी पीसीआर टेस्टची किंमत 800 रुपयांपर्यंत आणला आहे. याची किंमत केंद्र सरकारने साडे चार हजार रुपये ठरवली होती. मात्र आम्ही दोन टप्यात तो खाली आणला आहे. तसेच येत्या आठवड्यात तो आठशे रुपयांपर्यंत आणणारा असा सूतोवाच राजेश टोपे यांनी केला आहे. त्याशिवाय मास्कच्या किंमतीदेखील खाली आणल्याचं टोपे यांनी सांगितलं.”

राज्य सरकारचं काम अत्यंत पारदर्शक 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रिपब्लिकन न्यूज चॅनलचा टीआरपी प्रकरण, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशासह इतर गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

“रिपब्लिकन न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याची काम काही चॅनल्सने केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. तसेच विनाकारण यंत्रणेला पोलीस खात्याला बदनाम करण्याचं काम कोणी करत असेल तर दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे,” असे स्पष्ट मत टोपेंनी मांडलं आहे.

“महाराष्ट्र सरकार हे लोकशाही आघाडीचे सरकार आहे. सरकार कोरोना काळात अत्यंत पारदर्शक आणि जेवढ्या जमेल तेवढ्या कार्यक्षमतेने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्याकडून लक्ष विचलित करण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत असतील तर ते चुकीचं आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या लोकांनी वाट करुन दिली पाहिजे 

त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशासंदर्भात टोपे यांनी भाष्य केलं आहे. “जर योग्य लोक असतील तर राष्ट्रवादी नेहमीच त्यांचं स्वागत करतो. तसेच पक्ष कर्तृत्ववान माणसाला स्वीकारतच असतो. प्रत्येक पक्षात लोक कर्तृत्ववान असतात. जर कोणी येऊ इच्छित असेल तर राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना वाट करून दिली पाहिजे,” असा सल्ला राजेश टोपेंनी दिला आहे. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

संबंधित बातम्या : 

लोकशाहीचा चौथास्तंभ कमकुवत करण्याचं कारस्थान टीआरपी घोटाळ्यातून उघड : सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांना मेसेज टाकला आहे, थोड्या वेळाने पुन्हा संपर्क साधेन : संभाजीराजे

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....