Rajesh Tope | आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय भरती, 17 हजार जागा लवकरच भरणार : राजेश टोपे
राज्यात 17 हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.
औरंगाबाद : “आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार औरंगाबादेत पोहोचले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते (Rajesh Tope Said Candidate Will Recruited In Health Department Without Interview).
आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती – राजेश टोपे
“आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली आहे आणि राज्यात 17 हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत”, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मृत्यूदर कमी करण्याचा आमचा प्रयत्न – राजेश टोपे
“राज्यात कोरोना परिस्थिती सकारात्मक आहे. धारावी, मालेगाव झिरोवर आले आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती सुधारत आहे. संख्या वाढण्याची भीती नाही. आमचा प्रयत्न हा मृत्यूदर कमी करणे आहे आणि त्यात यश मिळत आहे”, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
“आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयं आणि डॉक्टर ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. मात्र, राज्यातील डॉक्टर्सनी ती परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये, हात जोडून विनंती आहे डॉक्टर्सनी सेवा द्यावी”, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील डॉक्टरांना केलं आहे (Rajesh Tope Said Candidate Will Recruited In Health Department Without Interview).
अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर – राजेश टोपे
“अमिताभ बच्चन यांचा हा कुटुंबाचा विषय आहे. मी रुग्णालयाच्या डॉक्टरशी संपर्कात आहे, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
“नवजीवन सोसायटीत झालेला कोरोना हा काही नवीन प्रकार नाही, कोरोना सगळीकडे पसरतो आहे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे”, असे आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
शरद पवारांचा औरंगाबाद दौरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार थेट औरंगाबादेत पोहोचले. यावेळी त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. या बैठकीला औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
कोरोना संकटात काम करावंच लागेल, शरद पवारांचं खासगी डॉक्टरांना इंजेक्शनhttps://t.co/HwVnxkAEFL#SharadPawar #Aurangabad #PrivateHospitals@PawarSpeaks @rajeshtope11 @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 25, 2020
Rajesh Tope Said Candidate Will Recruited In Health Department Without Interview
संबंधित बातम्या :
माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता? : शरद पवार