ऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश टोपे भडकले

ऑक्सिजनचा टँक जिल्हा रुग्णालयात बसून एक महिना झाला. मात्र, अद्याप ऑक्सिजनची पाईप लाईन न झाल्याने आरोग्यमंत्री चांगलेच संतापले.

ऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश टोपे भडकले
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 12:19 AM

परभणी : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात (Health Minister Rajesh Tope) कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासनाचा गलथान कारभार आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आला. ऑक्सिजनचा टँक जिल्हा रुग्णालयात बसून एक महिना झाला. मात्र, अद्याप ऑक्सिजनची पाईप लाईन न झाल्याने आरोग्यमंत्री चांगलेच संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत हे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले (Health Minister Rajesh Tope).

“परभणी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमची सकारात्मक भूमिका असून त्यासाठी प्रयत्न करणार. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावं, पण एका हॉस्पिटलसाठी 1 हजार कोटी खर्च येतो. पण 36 जिल्ह्यासाठी 36 हजार कोटी खर्च करणे सरकारला परवडेल का?, त्यामुळे विभागातील गरजेनुसार वैद्यकीय महाविद्यलांना मंजुरी देणार”, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिलं.

“एकदा कोरोना आजार झाल्यानंतर पुन्हा हा आजार होतो हे साफ खोटं आहे, अस कोणत्याही अधिकृत आरोग्य संघटनेने सांगितले नाही, त्यामुळे मध्यामांनी चुकीची माहिती देणं टाळावं. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे, त्यांना मिळाला पाहिजे”, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

वेग मंदावला! राज्यात 5,984 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढताना दिसत होते. पण रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं दिलासादायक चित्र आज समोर आलं आहे. आज राज्यात 5,984 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 13,84,879 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.48 % एवढे झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे (Health Minister Rajesh Tope).

संबंधित बातम्या :

वेग मंदावला! राज्यात 5,984 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तब्बल 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी

भारतात फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल; केंद्रीय समितीचे भाकीत

बरे झालेल्या कोरोना रुग्णांना अनेक महिन्यांपर्यंत आजाराच्या लक्षणांचा त्रास : ऑक्सफर्ड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.